Effects of walking barefoot : अनवाणी चालणं फायदेशीर की घातक? वाचा आश्चर्यकारक निष्कर्ष

अनवाणी चालावं की चालू नये, असा प्रश्न अनेकादा पडतो. वास्तविक, अनवाणी चालण्याचे जसे काही फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत.

Effects of walking barefoot
अनवाणी चालणं फायदेशीर की घातक?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अनवाणी चालल्यामुळे होतात अनेक फायदे
  • तयार होतं पृथ्वीशी नातं
  • अनेक विकार होतात दूर

Effects of walking barefoot : अनवाणी (Barefoot walking) चालण्याचा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. विशेषतः ग्रामीण भागात (Rural Area) बालपण गेलेल्या अनेकांना अनवाणीच घराबाहेर पडण्याची, धावण्याची, खेळण्याची सवय असते. काहीजणांना मात्र अजिबातच तशी सवय नसते. लहानपणी अनेकजण अनवाणी खेळत असतात, बागेत पळत असतात किंवा शेतातून फिरत असतात. मात्र हळूहळू आपल्या सोयीसाठी आपण चप्पल घालायला सुरुवात करतो आणि चपलेची सवय होऊ लागते. त्यानंतर अनवाणी चालणं कमी कमी होत जातं. अनवाणी चालण्याचे अनेक फायदे असल्याचं वैद्यकशास्त्रात दिसून आलं आहे. त्याचप्रमाणं काही बाबतीत अनवाणी चालल्यामुळे नुकसानदेखील होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया अनवाणी चालण्याचे फायदे आणि तोटे काय काय असतात, याविषयी. 

अनवाणी चालण्याचे फायदे

अनवाणी चालल्यामुळे तुम्ही निसर्गाशी आणि जमिनीशी एक नातं तयार करत असता. अनवाणी चालल्यामुळे पायाची सूज कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हृदयाच्या आरोग्यासाठीदेखील अनवाणी चालणं उपयुक्त ठरतं. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अनवाणी चालण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणं मनावरचे ताणतणावही अनवाणी चालल्यामुळे दूर होतात. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की अनवाणी चालल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. अनेक प्रकारची जुनी दुखणी बरी करण्यासाठी अनवाणी चालण्याचा सल्ला दिला जातो. झोपेशी संबंधित अनेक विकार हे अनवाणी चालल्यामुळे दूर होतात. त्याचप्रमाणं डोळ्याांची दृष्टी सुधारण्यासाठी अनवाणी चालल्याचा प्रचंड फायदा होत असतो. 

अधिक वाचा - Optical Illusion IQ Test: टिकटॉक स्टारनं अनेकांना खाजवायला लावलं डोकं; फक्त 1% लोक 30 सेकंदात शोधू शकतात तिसरा प्राणी

नैसर्गिक ॲक्युपंक्चर

शरीरातील अनेक भाग सक्रीय करण्यासाठी ॲक्युपंक्चरचा वापर केला जातो. अनेकांचे शारीरिक विकार दूर करण्यासाठी ॲक्युपंक्चर तंत्राची मदत घेतली जाते. मात्र ज्या व्यक्तींना अनवाणी चालण्याची सवय असते, त्यांचं रोजच नैसर्गिकरित्या ॲक्युपंक्चर होत असतं. त्यामुळे वेळोवेळी शरीरातील वेगवेगळ्या भाागांना सक्रीय करण्याचं काम सुरूच राहतं आणि व्यक्ती अधिक आरोग्यपूर्ण होऊ लागते. 

अधिक वाचा - International Dog Day का साजरा केला जातोय? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अनवाणी चालल्यामुळे होणारं नुकसान

अनवाणी चालल्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढण्याची शक्यता असते. अनेक विषारी आणि घातक किडे, कीटक यांचा स्पर्श पायाला होत असल्यामुळे त्यांचा दंश किंवा संसर्ग पायाला होण्याची शक्यता असते. अनेक घातक द्रव्यं पायाच्या त्वचेवाटे शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते. त्यामुळे स्विमिंग पूल, लॉकर रुम, जिम किंवा बिचवर फिरताना अनवाणी फिरणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. 

डिस्क्लेमर- या सर्व अनवाणी चालल्यामुळे होणाऱ्या फायद्यातोट्याविषयीच्या सामान्य टिप्स आहेत. याबाबत तुम्हाला काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी