Benefits of Raw Banana: वजन कमी करायचंय? कच्चं केळ खा, जाणून घ्या अधिक फायदे

तब्येत पाणी
Updated Jan 23, 2020 | 13:21 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Health Benefits of Raw Banana: पिकलेल्या केळींसोबतच कच्ची केळी सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असतात. कच्ची केळी पोषक तत्त्वांचं एकप्रकारे पॉवरहाऊसच आहे. तर मग जाणून घ्या याचे फायदे...

Health Benefits of Raw Banana
वजन कमी करायचंय? कच्चं केळ खा, जाणून घ्या अधिक फायदे  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • कच्च्या केळींमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं
  • केळ्यात स्टार्च प्रतिरोधी क्षमता असते
  • कच्ची केळी आजारांशी लढण्यासाठी फायदेशीर

मुंबई: पिकलेली केळी तर आपण नेहमीच खात असाल, मात्र आपल्याला कच्च्या केळींचे फायदे माहितीय का? आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण कच्ची केळी आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय फायदेशीर असतात. फायबर, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी६, प्रोव्हिटॅमिन-ए, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, झिंक आणि फेनोलिक सारख्या तत्त्वांनी परिपूर्ण अशी कच्ची केळी अनेक आजारांवरही उपयुक्त आहे.

फायबर आणि आयुर्वेदिक गुणांनी युक्त असलेली कच्ची केळी डायबिटीज, लठ्ठपणा, गॅस्ट्रोइंटेस्टायनल आजारांसोबतच कँसरपासून रक्षण करण्यासाठीही फायदेशीर ठरते. कच्ची केळी आपण कुठल्याही स्वरूपात आपल्या खाण्यात वापरू शकता. आयरनचं भरपूर प्रमाण असल्यामुळे कच्ची केळी शिजवून खाणं अधिक फायदेशीर ठरतं. कच्च्या केळांची भाजी किंवा भरीत करून आपल्या दररोजच्या आहारात त्याचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून आपण आपला बचाव करू शकतो.

जाणून घ्या कच्च्या केळींचे आणखी फायदे

  • पचनशक्ती वाढवतं- कच्च्या केळांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं आणि सोबतच कच्ची केळी स्टार्च विरोधी क्षमतेनं सुद्धा भरलेली असतात. त्यामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती वाढविण्याचं काम ते करतात. कच्ची केळी सहजपणे पचतात आणि त्यानं आतडेही स्वच्छ राहतात. पोटाच्या अनेक समस्या दूर करण्याचं काम कच्ची केळी करतात.
  • भूक आणि वजन कमी करण्यात उपयुक्त – जर आपल्याला भूक धरवत नाही आणि खाल्ल्यानंतर पुन्हा-पुन्हा भूक लागत असते. तर आपण कच्ची केळी अवश्य खावीत. कच्च्या केळ्यामुळे वजन कमी होण्यात खूप मदत मिळते. कच्च्या केळांमध्ये फायबर अधिक असतं त्यामुळे ते खाल्ल्यानंतर पोट खूप काळापर्यंत भरलेलं वाटतं.
  • शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही फायदेशीर – रक्तात असलेलं साखरेचं प्रमाण जर वाढलं तर मधूमेह होण्याची भिती वाढते. यापासून आपलं रक्षण करण्यासाठी कच्ची केळी फायदेशीर ठरतात. कच्च्या केळींमध्ये स्टार्च विरोधी घटक आणि फायबरचं अधिक प्रमाण असल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यामध्ये किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यात त्याचा उपयोग होतो. सोबतच कच्च्या केळ्यांमध्ये असलेले अँटी डायबिटिक गुण सुरक्षा कवच म्हणून काम करतात. याशिवाय जर कुणाला डायबिटिज असेल तर त्यानं कच्ची केळी खावीत. मात्र त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.  
  • पोटाशी निगडित आजारांवर फायदेशीर – गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजेच पोटाचे आजार जसे की बद्धकोष्ठता, मूळव्याध, संसर्ग, अतिसार इत्यादी दूर करण्यासाठीही कच्ची केळी फायदेशीर ठरतात.
  • कँसरपासूनही रक्षण करतात कच्ची केळी – योग्य वेळी उपचार न झाल्यास कँसर हा आजार जीवघेणा ठरतो. कँसरपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून कच्च्या केळींचा आपण वापर करू शकतो. कच्च्या केळींच्या पिठामध्ये स्टार्च प्रतिरोधी तत्त्व असतात, जे कँसरशी लढण्याची आपली क्षमता वाढवतात.
  • हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर – हाय कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर हृदयाच्या आजारांचं कारण असतात. आपलं हृदय फिट ठेवण्याचे गुण कच्च्या केळींमध्ये आहेत. यात फायबर अधिक असल्यानं कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं. याशिवाय कच्च्या केळींमध्ये न्यूट्रास्यूटिकल गुण असतात, जे हृदयाशी निगडित समस्या दूर करण्याचं काम करतात.

आतापर्यंत आपण कच्च्या केळींचे फायदे पाहिले आता जाणून घ्या त्याचे नुकसान

कच्ची केळी खाल्ल्याचे फायदे अधिक आहेत मात्र काही प्रमाणात त्याचे नुकसान सुद्धा आहेत. कारण जर कच्ची केळी आपण सतत आणि खूप प्रमाणात खाल्ली तर आपली पचनक्रिया फायबर पचवू शकण्यात असमर्थ होतात. यामुळे गॅस, सूज आणि पोटदुखी सुरू होऊ शकते. कच्च्या केळीमुळे रक्तात असलेलं साखरेचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे लोकांना लो-शुगरचा त्रासही होऊ शकतो. ज्यांना केळींची अॅलर्जी आहे त्यांनी अजिबात कच्ची केळी खाऊ नये.

त्यामुळे जर आपल्याला कच्च्या केळींचं खाणं फायदेशीर करून घ्यायचं असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच त्याचा वापर करा. कारण कच्ची केळी फायदेशीर आहेत, पण फक्त त्याचं खाण्याचं प्रमाण योग्य हवं.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...