पनीरमुळे लठ्ठपणा वाढतो? जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे पनीर

तब्येत पाणी
Updated Nov 26, 2019 | 19:36 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Paneer benefits and disadvantages: चव आणि आरोग्यानं परिपूर्ण असं पनीर आपल्याला खूप आवडत असेल. मात्र आपल्याला पनीर खरंच किती आरोग्यदायी आहे हे माहितीय का? जाणून घ्या याबद्दलच...

calories in paneer
जाणून घ्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे पनीर  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • १०० ग्रॅम पनीरमध्ये असतात ९८ कॅलरीज
  • कच्च पनीर खाल्ल्यास वजन कमी करण्यात तर पनीर तळून खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते
  • पनीरमध्ये प्रोटीनसोबतच कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक आणि आयर्न सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं

पनीर हा प्रोटीन्सचा एक मुख्य स्रोत आहे, हे आपल्या सर्वांनाच माहितीय. मात्र यात फॅट्स पण असतात. अशावेळी आपल्या आहारात पनीरचा योग्य पद्धतीनं वापर कसा करावा हे माहिती असणं आवश्यक आहे. पनीरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक आणि आयर्न सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं आणि हेच कारण आहे की, पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं. पण काही बाबतीत पनीर खाणं योग्य नाही. ज्या लोकांच्या शरीरात यूरिक अॅसिड वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला दिला जातो. तर ज्यांना प्रोटीनची आवश्यकता असते त्यांनी पनीर अवश्य खावं.

पनीर एक हेल्दी फूड कॅटेगरीमध्ये समाविष्ट केलेलं आहे. मात्र ते कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जाणून घ्या याबाबत...

१०० ग्रॅम पनीरमध्ये असतात ९८ कॅलरीज

जर आपण १०० ग्रॅम पनीर खात असाल तर आपल्याला त्यापासून जवळपास ९८ कॅलरीज मिळत असतात. तर १०० ग्रॅम पनीरमधून आपल्याला ११.१२ ग्रॅम प्रोटीन मिळतं. तर ३.३८ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ७ ग्रॅम फॅट्स, २.६ ग्रॅम साखर सुद्धा पनीरमध्ये आढळते. त्यामुळेच पनीरची भाजी करून किंवा सलाडमध्ये टाकून खावं. पनीर नेहमी कच्चं खावं. पनीर तळल्यानं त्यातील फॅट्सचं प्रमाण वाढतं आणि कॅलरीज सुद्धा प्रमाण वाढतं. त्यामुळे कच्च पनीर वेट लॉज मॅनेजमेंट करतांना खाण्यात असावं कारण तळलेलं पनीर वजन वाढवतं.

जाणून घ्या पनीर किती आणि कधी आणि कसं खावं

पनीर एका दिवसात २०० ग्रॅमहून अधिक खाऊ नये. एका वेळेत १०० ग्रॅम पनीर पुरेसं असतं. जर आपल्या शरीरात वॉटर रिटेंशनची समस्या असेल तर अशा व्यक्तीनं रात्री कधीही पनीर खाऊ नये. अशा व्यक्तींनी पनीर नाश्ता किंवा लंचमध्येच खावं. तरच ते शरीरासाठी फायदेशीर ठरेल.

जर आपल्याला रात्री पनीर खायचं असेल तर ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच खावं. रात्री उशीरा पनीर खाऊ नये. पनीर नेहमी भरपूर प्रमाणात फायबर असणाऱ्या विविध भाज्यांसोबत मिक्स्ड करून खावं. त्यानं प्रोटीन आणि फायबरमुळे आपलं पोट खूप काळासाठी भरलेलं जाणवतं आणि ते शरीरात खूप चांगल्या पद्धतीनं पचवल्या जातं. पनीर आणि हंगामी भाज्या बरोबर प्रमाणात खाव्या, कारण पनीरमध्ये सोडियमचं प्रमाण खूप असतं जे भाज्यांमध्ये असलेल्या पोटॅशिअमसोबत मिसळून हाय फायबर डाएटमध्ये रूपांतरीत होतात.

जाणून घ्या पनीरचे खास फायदे

१. पनीर खाल्यानं आपलं वजन कमी होऊ शकतं. भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे पनीरमुळे बऱ्याच काळापर्यंत आपलं पोट भरलेलं असल्याचं जाणवतं.

२. रोज पनीर खाल्ल्यानं आपली हाडं मजबूत होतात आणि गुडघ्याचं दुखणंही कमी होतं.

३. मधुमेहाच्या रुग्णांनी पनीर अवश्य खावं. पनीरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि पनीर खाल्यानंतर ते लगेच ब्लड शुगरमध्ये परिवर्तीत होत नाही.

४. कॅल्शिअम आणि प्रोटीन दोन्हींच्या कमतरतेनं संधिवात होतो. पनीर शरीरातील या दोन्ही कमतरता भरून काढतं.

५. पनीरमध्ये व्हिटॅमिन डी खूप प्रमाणात असतं त्यामुळे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनीच पनीर खायला हवं.

तर मग आता पनीरचं आपल्या डाएटमधील सहभाग वाढवा आणि आरोग्य मिळवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी