Benefits of Alsi Beej : Cholesterol आणि High BP कंट्रोल करा, टाळा Heart Attack चा धोका

flaxseeds for reduce bad cholesterol and control high bp or control high blood pressure :

flaxseeds for reduce bad cholesterol and control high bp
Cholesterol आणि High BP कंट्रोल करा, टाळा Heart Attack चा धोका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Cholesterol आणि High BP कंट्रोल करा, टाळा Heart Attack चा धोका
  • अळशीच्या बिया खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते
  • अळशीच्या बिया खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते

flaxseeds for reduce bad cholesterol and control high bp or control high blood pressure : दीर्घकाळ एका ठिकाणी बसून काम करणे तसेच फ्रायफूड, फास्टफूड आणि जंकफूड खाणे यामुळे लठ्ठपणा, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह अशा स्वरुपाच्या समस्या जाणवत असलेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. शरीरातले बॅड कोलेस्टेरॉल वाढून वेगवेगळ्या समस्या भेडसावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यावर उपाय करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे तसेच अळशीच्या बिया अर्थात फ्लॅक्ससीड्स खाणे हिताचे आहे. 

दररोज मर्यादीत प्रमाणात अळशीच्या बिया खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणा, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह अशा स्वरुपाच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटिन्स (प्रथिने), आयर्न (लोह), कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, फायबर, कॉपर, सेलेनियम, कॅरोटिन असे अनेक पोषक घटक असतात. तसेच अळशीच्या बिया अँटी फंगल आणि अँटी व्हायरल पण असतात. यामुळे दररोज मर्यादीत प्रमाणात अळशीच्या बिया खाल्ल्याने शरीराला फायदा होतो. 

Unhealthy food for kids: सावधान! मुलांना चुकूनही देऊ नका हे पदार्थ, पडेल महागात

पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

बॅड कोलेस्टेरॉल कमी होते : दररोज मर्यादीत प्रमाणात अळशीच्या बिया खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. पेरिफेरल आर्टरी डिसिझने त्रस्त असलेल्यांना अळशीच्या बिया खाल्ल्याने फायदा होतो. अळशीच्या बियांमध्ये शरीर सहज पचवू शकेल असे फायबर, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. अळशीतले फायबर, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे तिन्ही घटक बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. अळशीत असलेले लिनोलेनिक अॅसिड हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. 

अळशीच्या बिया खाण्याची पद्धत : दररोज सकाळी 1 चमचा किंवा 5 ग्रॅम भाजलेल्या अळशीच्या बिया व्यवस्थित चावून खा. हवं असल्यास दलिया किंवा दह्यात मिक्स करून भाजलेल्या  अळशीच्या बिया खाऊ शकता. यामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी सांभाळणे सोपे होईल. किडनीशी संबंधित समस्या असल्यास अळशीच्या बिया खाण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी