Benefits Of Bay Leaves: तेजपत्ताचा काढा प्या आणि या आजरांना करा टाटा-बायबाय

Bay Leaves: काही शारीरिक समस्या अशा असतात की ज्या प्रत्येक घरात असतात. या समस्यांकडे दुर्लक्षही केलं जातं, या समस्यांवरील उपचार हे घरीच लपलेले असतात. तेजपत्ता देखील असंच औषधी आहे जो काही समस्या दूर करतात.

Bay leaves
तेजपत्ताचा काढा ठरतो या आजरांसाठी खूप फायदेशीर 

थोडं पण कामाचं

  • तेजपत्ताचा पानं वापरलं जात जेवणात
  • जेवणाची चव वाढवण्यासाठी तेजपत्ताचा मोठ्या प्रमाणात वापर
  • तेजपत्ता पिण्याचे हे आहेत फायदे, जाणून घ्या

Benefits Of Bay Leaves: तेजपत्ता असा एक मसाला आहे जो प्रत्येकाच्या घरात असतो. याचा वापर प्रत्येक भाजीत देखील केला जातो. विशेष म्हणजे, हे केवळ आपल्या एका वेगळ्या चवीसाठी नाही तर आपल्या औषधी गुणांसाठी देखील खूप काम करतं. मात्र याबाबत प्रत्येकाला माहिती नसते. लोकं खाण्यातली आपली चव वाढवण्यासाठी याचा वापर करतात. 

तेजपत्तामध्ये असतात मिनिरल्स 

तेजपत्ताचा काढा बऱ्याच आजारांवर एका औषधांप्रमाणे काम करतो. याचा काढा प्यायल्यानं शरीरातील बऱ्याच प्रकारची कमतरता दूर होते. कारण यात बऱ्याच प्रकारचे मिनिरल्स असतात. तेजपत्ता कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सेलेनियम आणि आयरन देखील असतं. इतकंच नाही तर यात अॅन्टिऑक्सिडेंट्स सुद्धा असतं ज्यामुळे कॅन्सर, ब्लड क्लॉटिंग आणि हृदयाशी निगडीत काही समस्या असतील त्या दूर होतात. यासोबतच तेजपत्ताचा काढा काही अन्य आजरांसाठी खूप फायदेशीर असतो. 

जाणून घ्या तेजपत्ताचा काढा पिण्याचे फायदे 

  • महिलांमध्ये सर्वांत जास्त तक्रारी या कमरे संदर्भात असतात. जर का तुम्हाला ही समस्या असेल तर तुम्हा तेजपत्ताचा काढा दिवसभरात दोन वेळ रोज प्यावा. त्यासोबतच तेजपत्ताचं तेल आणून त्यानं कमरेवर मालिश करा. तेजपत्ता मोहरीच्या तेलात शिजवून तुम्ही स्वतःहून देखील तेल बनवू शकता. 
  • थंडी वाजत असताना थंडी वाजल्यानंतर होणारा शरीर दुखी तुम्हाला तेजपत्ताचा काढा पिणं गरजेचं आहे. त्यासोबतच या तेलानं मालिश देखील करा. 
  • दुखापत झाल्यास तुम्हाला तेजपत्ता काढा पिणं गरजेचं आहे आणि त्याचच तेल लावावं. त्यामुळे दुखापत झाल्यानंतर सूज आणि वेदनेतून थोडा आराम मिळतो. तेजपत्ता वाटून जखम झालेल्या ठिकाणी लावावा. 
  • कधी कधी झोपेत नसा खेचल्या जातात किंवा पटकन गोळा येता किंवा नसांना सूज येते. अशाक तेजपत्ताचा काढा, तेजपत्ताचं तेल जरूर वापरा.  हे वेगानं आराम देतात. 

असा बनवा काढा 

  1. १० ग्रॅम तेजपत्ता, १० ग्रॅम ओवा, ५ ग्रॅम बडिशेप वाटून घ्या आणि एक लीटर पाण्यात टाकून जोपर्यंत उकळवा तोपर्यंत ते पाणी अर्ध होतं नाही.
  2. जेव्हा हे मिश्रण थंड होईल तेव्हा तो काढा पिण्यास सुरूवात करा. 
  3. तेजपत्ताचा काढा काही त्रास नसतानाही पिणं चांगलं असतं. त्यामुळे शरीरात होणारी मिनिरलची कमतरता दूर करते.

(सूचना: सादर केलेला लेख टिपा आणि सल्ला फक्त सामान्य माहिती आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला घेतला जाऊ शकत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...