मासिक पाळीत त्रास होतोय तर हा ज्यूस नक्की प्या 

तब्येत पाणी
Updated Jul 26, 2018 | 21:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

गाजरच्या ज्यूसचे अनेक फायदे आहेत. पुरूष असो वा महिला दोघांसाठी गाजरचा ज्यूस खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हांला गाजराच्या ज्यूसचे फायदे किती याची पूर्ण लिस्ट देणार आहोत.

carrot juice
गाजराचा ज्यूस  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई : गाजर सलाड व्यतिरिक्त हलवा आणि मुरंबाच्या रूपातही खाल्ले जाते. पण तुम्हांला माहितीय का, गाजरचा ज्यूस देखील तितकाच चवदार असतो. खासकरून गाजरचा ज्यूस हा हेल्दी ड्रिंक म्हणून बरेच फायदे आहेत. 

या ज्यूसमुळे डोळ्याची दृष्टी देखील वाढते. याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीत होणाऱ्या समस्यांही हा ज्यूस दूर करतो. एवढंच नाही तर पुरूषांसाठी ही गाजर ज्यूस पिण्याचे खास फायदे आहेत.

खालीलप्रमाणे गाजर ज्यूस पिण्याचे फायदे : 

१) गाजर ज्यूस प्यायल्याने रक्त साफ होते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास ही गाजराचा ज्यूस मदत करतो. 

२) गाजरचा ज्यूस नियमित प्यायल्याने कॅन्सरचा धोका उद्भवत नाही. 

३) गाजरचा ज्यूसमध्ये बरेच पौष्टिक तत्त्वे असतात. ज्यामुळे  पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. गाजरच्या ज्यूसमध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं, मिरीपूड आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यावा त्यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात. 

४)  त्वचा, केस,  नखे यांमध्ये असलेल्या  समस्या देखील गाजरचा ज्यूस प्यायल्याने कमी होतात. 

५)  जर शरीरावर कोणताही भाग भाजला किंवा जळाला असेल तर त्यावर गाजरचा ज्यूस लावल्यास  फायदेशीर ठरते.

६) मासिक पाळीच्या काळात गाजरचा ज्यूस जास्त फायदेशीर ठरतो. 

७) गाजरच्या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन ए असतो. ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात. 

८)  व्हिटामिन ए च्या भरपूर प्रमाणात असल्याने ज्यूस नियमित प्यावा. त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून बचाव होतो. 

९)  गाजरचा ज्यूस प्यायल्याने मूत्रसंबंधित समस्यांही होत नाहीत. 

१०)  गाजरचा ज्यूस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि वारंवार  होणारी सर्दी आणि खोकल्यापासून शरीराला सुरक्षित ठेवतो. 

११) गाजरामध्ये व्हिटामिन सी देखील आढळते. त्यामुळे संधिवाताची समस्या उद्भवत नाही. 

१२) गाजरामध्ये व्हिटामिन सीच्या प्रमाण भरपूर असलल्यामुळे गाजरचा ज्यूस दात बळकट होण्यास मदत करतो आणि  हिरड्यामधून होणाऱ्या रक्तस्त्रावाची समस्या देखील दूर करतो. 

१३) गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने स्पर्मची गुणवत्ता वाढण्यासही मदत होते. 

१४)  गाजरचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल मर्यादित राहते. 

१५) गाजरचा ज्यूस गाळून पिऊ नये. त्यामुळे ज्यूसमध्ये असलेल्या फायबरचा ही शरीराला फायदा होतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी