Men Health Tips: स्पर्म काउंट वाढवण्यासाठी पुरुषांनी जरूर खा 'हा' पदार्थ, नक्कीच फायदा होईल

तब्येत पाणी
Updated Nov 07, 2022 | 17:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Benefits Of Dates: खजूर पुरुषांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. पुरुषांसाठी खजूर खाण्याचे फायदे (Benefits Of Dates)आहेत. खजूरमध्ये कॅलरी, फायबर आणि तांबे यांसारखे पोषक घटक आढळतात, त्यामुळे याच्या सेवनाने पुरुषांमध्ये शारीरिक शक्ती वाढते.

 Benefits Of Dates increase sperm count in men
स्पर्म काउंट वाढवण्यासाठी खा 'हा' पदार्थ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्पर्म काउंट वाढवण्यासाठी खजूर खावा
  • खजूरामुळे मेंदूची शक्ती वाढते, रक्तातील साखरही नियंत्रणाच राहते
  • रात्री दूधात उकळून किंवा सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला खजूर खाणे फायदेशीर

Benefits Of Dates For Men: खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits Of Dates) आहे. खजूर खाल्लायने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.पुरुषांसाठी खजूर कोणत्याही औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. पुरुषांनी खजूर खाल्ल्यास त्यांची शारिरीक शक्ती वाढते. कारण खजूरमध्ये कॅलरी, फायबर, प्रोटीन, पोटॅशियम आणि कॉपर यांसारखे पोषक घटक आढळतात. खजूर खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. (Benefits Of Dates increase sperm count in men)

पुरुषांसाठी खजूर खाण्याचे फायदे

मेंदूची शक्ती वाढते


खजूर खाल्ल्याने तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. खजूरमध्ये व्हिटॅमिन बी आणि कोलीन आढळतात, जे लक्षात ठेवण्याची आणि शिकण्याची क्षमता वाढवतात. त्यामुळे पुरुषांनी आपल्या आहारात खजूरचा समावेश करावा.

अधिक वाचा : बिपाशा बासूचा बेधडक डान्स

स्पर्म काउंट वाढतो

खजूर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यास मदत करतात. कारण खजूरमध्ये एस्ट्रॅडिओल आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात. यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरुषांनी खजुराचे सेवन जरूर करावे.


रक्तातील साखर नियंत्रणात राहते

खजूराचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे अशा लोकांनी खजूर नक्की खावा. खूप फायदेशीर आहे.

अधिक वाचा : ... अब्दू रोजिक-शिव ठाकरेची धमाल कॉमेडी

खजूर खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

1.  तुम्ही रात्री दुधासोबत खजूर खाऊ शकता, किंवा दुधात खजूर टाकून ते उकळ्यानंतर ते दूध पिऊ शकता

2. रात्रभर खजूर पाण्यात भिजत ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावा त्यामुळेही खूप फायदा होतो. 

अधिक वाचा :  Virat Kohli:टी20 वर्ल्डकपदरम्यान विराट कोहलीसाठी मोठी खुशखबर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी