Desi Ghee Benefits: चेहरा बनवा तुकतुकीत आणि चमकदार, ‘देशी तुपा’चा असा करा वापर

ड्रायनेस दूर करण्यासाठी अनेकजण महागड्या मॉयश्चरायजरचा उपयोग करत असतात. मात्र त्यामुळे केवळ काही काळापुरतीच त्वचा मऊ आणि तुकतुकीत राहते. या क्रीममध्ये केमिकल्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेवर त्याचे वेगळे साईड इफेक्ट होण्याचीही शक्यता असते. बाजारात मिळणारे मॉयश्चरायझर्स धुवून टाकले की काही वेळातच त्वचा पुन्हा कोरडी पडायला सुरुवात होते.

Desi Ghee Benefits
चमकदार त्वचेसाठी देशी तुपाचा वापर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात त्वचा पडते कोरडी
  • त्वचा मॉयश्चराईज करण्यासाठी देशी तूप हा सर्वोत्तम उपाय
  • बाजारातील मॉयश्चरायजपेक्षा मिळतो चांगला आणि दीर्घकालीन परिणाम

Desi Ghee Benefits: हिवाळ्याची सुरुवात होत आहे. थंडीत त्वचा कोरडी पडणं (Dry skin) ही एक सामान्य समस्या असते. प्रत्येकालाच थंडीच्या काळात त्वचा रुक्ष आणि कोरडी होत असल्याचा अनुभव येतो. कित्येकदा तर त्वचा इतकी कोरडी पडते की चेहऱ्यावर पांढरे चट्टे उठायला सुरुवात होते. ड्रायनेस दूर करण्यासाठी अनेकजण महागड्या मॉयश्चरायजरचा उपयोग करत असतात. मात्र त्यामुळे केवळ काही काळापुरतीच त्वचा मऊ आणि तुकतुकीत राहते. या क्रीममध्ये केमिकल्सचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेवर त्याचे वेगळे साईड इफेक्ट होण्याचीही शक्यता असते. बाजारात मिळणारे मॉयश्चरायझर्स धुवून टाकले की काही वेळातच त्वचा पुन्हा कोरडी पडायला सुरुवात होते. त्याऐवजी जर देशी आणि घरगुती तुपाचा (Desi Ghee) वापर केला, तर त्वचेच्या कोरडेपणाची समस्या दूर होण्यास मोठी मदत होऊ शकते. 

कोरडेपणा होतो दूर

थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी देशी तूप लावणं उत्तम असतं. देशी तुपात असे घटक असतात, जे चेहऱ्यावर डार्क स्पॉट दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. रोज रात्री झोपताना देशी तूप एखाद्या क्रीमप्रमाणे चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकावा. असे केल्यामुळे तुपातील स्निग्धता त्वचेकडून शोषून घेतला जातो आणि त्वचा वारंवार कोरडी पडत नाही. 

काळे डाग जातील निघून

चेहऱ्यावरील ब्लॅक स्पॉट अर्थात काळे डाग कमी करणं ही काही साधी गोष्ट नसते. हे डाग हट्टी असतात आणि पटकन आपली जागा सोडत नाहीत. देशी तुपामुळे काळे डाग आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी होण्यास मदत होते. त्यासाठी चेहऱ्यावर देशी तूप लावून हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्या. जर तुम्हाला वेगाने चेहऱ्यावरील काळे डाग कमी करायचे असतील, तर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला तूप लावा आणि सकाळी उठल्यानंतर धुवून टाका. असं केल्यामुळे तुम्हाला लवकरच फरक जाणवायला सुरुवात होईल. 

अधिक वाचा - Cough and Cold: वेळोवेळी नाक साफ करत नसाल, तर होऊ शकतो अल्झायमर! वाचा, नव्या अभ्यासातील धक्कादायक नोंदी

दीर्घकाळ परिणाम

तूप हा एक स्निग्ध पदार्थ असतो. चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यासाठी स्निग्धतेची गरज असते. कृत्रिम मॉयश्चुरायझर्समध्ये असणारे घटक हे केवळ काही काळापुरतीच त्वचा मॉयश्चराईज ठेवू शकतात. मात्र तुपातून मिळणारी स्निग्धता ही दीर्घकाळ टिकते. त्यानंतर दिवसभर तुमची त्वचा मॉयश्चराईज राहते आणि कोरडी पडत नाही. शिवाय तुपाचे इतरही अनेक फायदे त्वचेच्या आरोग्यासाठी होत असतात. 

अधिक वाचा - Fenugreek Benefits:मेथीचे अनेक आरोग्यदायी फायदे, फक्त दाण्यांचा असा करा वापर

डिस्क्लेमर - तुपाचा चेहऱ्याच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न किंवा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी