Blood Donation : रक्तदान करण्याने शरीराला कोणते फायदे होतात, घ्या सविस्तर जाणून

तब्येत पाणी
Updated Mar 02, 2023 | 12:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Blood Donation benefits : रक्तदान करणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अशी बरीच लोकं आहेत जी अजूनही रक्तदान करत नाहीत. रक्तदान केल्याने गरजूंना जीवनदान हे मिळतेच पण त्याचा आपल्या आरोग्यालाही फायदेशीर ठरते.

Know the benefits of donating blood to the body
रक्तदान करणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • 18 वर्षांपासून ते ६५ व्या वर्षापर्यंत तुम्हाला रक्तदान करता येते
  • भारतात फक्त 37 टक्केच लोकं रक्तदान करतात
  • रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते

Blood Donation benefits : रक्तदान करणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अशी बरीच लोकं आहेत जी अजूनही रक्तदान करत नाहीत. रक्तदान केल्याने गरजूंना जीवनदान हे मिळतेच पण त्याचा आपल्या आरोग्यालाही फायदेशीर ठरते.

Blood Donation असं त्याला इंग्रजीत बोलतात. 18 वर्षांपासून ते ६५ व्या वर्षापर्यंत तुम्हाला रक्तदान करता येते. फायनान्शियल एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार भारतात फक्त 37 टक्केच लोकं रक्तदान करतात. जाणून घ्या काय फायदा असतो रक्तदानाचा.

वजन नियंत्रित ठेवण्यात मदत

तुमचे वजन जास्त वाढले असेल तर रक्तदान करण्याने फरक पडतो. अर्थात वजन कमी करणे हे मुख्य नियमांमध्ये बसत नाही. पण रक्तदान केल्याने वजन कमी करण्यासह सहनशक्तीही वाढते. ब्लड सेल्सने अधिक उत्पादन होऊन आरोग्याला फायदा आपल्या शरीराला मिळतो.

अधिक वाचा : झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

​रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत

शारीरिक आरोग्यासाठी रक्तदान फायदेशीर ठरते. रक्तदान केल्यानंतर रक्तातील प्लाज्मामध्ये ल्युकोसाईट्सची वाढ होते. ल्युकोसाईट्स आपल्या प्रतिकारशक्तीसाठी कार्यरत असतात. कोणत्याही गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती योग्य असणे गरजेचे असते.

अधिक वाचा : रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

हृदयरोगाचा धोका  कमी​

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील Iron Level नियंत्रित राहाते. रक्तातील लोहाचे प्रमाण अधिक असेल तर नसांना ब्लॉक करते आणि यामुळे रक्तप्रवाह नीट होत नाही. यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. तसंच हेमोक्रोमॅटोसिस आजारही होऊ शकतो. रक्तदान केल्याने हृदयापर्यंत रक्तप्रवाह योग्य राहून हृदयरोगाचा धोका राहात नाही.

कॅन्सरचा धोका कमी​

रक्तात लोह अधिक प्रमाणात झाल्यास रक्तदान हा लोह कमी करण्याचा चांगला पर्याय आहे. म्हणजेच रक्तात लोह अधिक प्रमाणात साठू नये म्हणून रक्तदान करावे. रक्तात लोह जमा झाल्यास, ब्लड कॅन्सरचा धोका वाढतो. कॅन्सरपासून लांब राहायचे असेल तर रक्तदान नियमित करावे.

मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर​

रक्तदानाचे शारीरिक अनेक फायदे आहेत, मात्र मानसिक फायदा अधिक आहे. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुम्हाला एक वेगळीच सुखद अनुभूती येते. आपल्या रक्तामुळे कोणाचे तरी प्राण वाचले आहेत ही भावनाच तुम्हाला आनंद देऊन जाते. हाच आनंद तुमच्या मानसिक स्थितीला संतुलित राखण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि रक्तदान करून तुम्ही अधिक मानसिकदृष्ट्या सक्षम होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी