Basil Leaves: तुळशीची पाने चघळल्याने या 5 समस्याही होतात दूर

Health Tips : घरात लावलेले तुळशीचे रोप (Basil Leaves) केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या (Health) दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदातदेखील (Ayurveda)तुळशीच्या मोठे महत्त्व दिले आहे, इतके की या रोपाला वरदानच मानण्यात आले आहे. तुळशीची पाने औषध म्हणून वापरली जातात.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • तुळशीचे भारतीय घरांमध्ये मोठे महत्त्व
  • आयुर्वेदानुसारदेखील तुळस अतिशय महत्त्वाची आहे
  • अनेक आजारांमध्ये तुळशीचा वापर

Health Benefits Of Eating Basil Leaves : नवी दिल्ली : भारतीय घरांमध्ये तुळशीचे महत्त्व मोठे आहे. याला फक्त धार्मिक, सांस्कृतिकच नव्हे तर वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीनेदेखील मोठे महत्त्व आहे. घरात लावलेले तुळशीचे रोप (Basil Leaves) केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या (Health) दृष्टिकोनातूनही खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदातदेखील (Ayurveda)तुळशीच्या मोठे महत्त्व दिले आहे, इतके की या रोपाला वरदानच मानण्यात आले आहे. तुळशीची पाने औषध म्हणून वापरली जातात. तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर संसर्गजन्य रोग दूर राहतात. अनेक आजारांवरील देखील तुळशीचा वापर केल्यास फायदा होता. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. (Benefits of eating basil leaves empty stomach every morning)

अधिक वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कधी करावे लग्न?

तुळशीच्या पानांचे फायदे-

तणाव 
एका संशोधनात असे आढळून आले आहे की, तुळशीच्या पानांमध्ये तणाव कमी करणारे हार्मोन म्हणजेच कोर्टिसोल असते. त्यामुळे दररोज रिकाम्या पोटी तुळशीची 12 पाने चघळल्याने तणाव दूर होतो. तणावावर तुळशीची पाने खूपच गुणकारी ठरतात.

मधुमेहामध्ये फायदेशीर
मधुमेहासारख्या चिवट आजारात तुळस गुणकारी आहे. तुळशीत युजेनॉल, मिथाइल युजेनॉल आणि कॅरिओफिलीन सारखे घटक आढळतात, ज्यामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी योग्यरित्या कार्य करतात. त्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण टिकून राहते आणि रक्तातील साखरेची पातळीही ठीक राहते.
तुळशीची पाने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

अधिक वाचा - आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण

तोंडाची दुर्गंधी दूर होते
अनेकांना तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास असतो. जर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पाने चावा. याचा फायदा होत श्वासाची दुर्गंधी दूर होईल.

डोकेदुखी आणि सर्दी 
अनेकांना नेहमी डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास होतो. जर एखाद्या व्यक्तीला सायनुसायटिस, अॅलर्जी, डोकेदुखी आणि सर्दीची तक्रार असेल तर त्यावर तुळशीची पाने फायद्याची ठरतात. तुळशीची पाने पाण्यात चांगले उकळून गाळून घ्या. यानंतर फिल्टर केलेले पाणी थोडे थोडे प्या. असे केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल.

अधिक वाचा : Horoscope, 26 October 2022: दिवाळी पाडवा कोणत्या राशींसाठी ठरणार अधिक आनंददायी?, पाहा तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

घसा खवखवण्यावर आराम
अनेकदा संसर्गामुळे किंवा खाण्यापिण्यात काही गडबड झाल्यास घसा खवखवण्याचा त्रास होतो. अशावेळी तुळशीची पाने उपयोगाची ठरतात. तुळशीची पाने पाण्यात टाकून चांगली उकळा. यानंतर हे पाणी प्यायल्याने घसादुखीपासून लवकरच आराम मिळेल.

तुळशीची पाने ही बहुगुणी असून त्याचा फायदा अनेक आजारांमध्ये आणि आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये होतो. दैनंदिन आयुष्यात तुळशीचा वापर केल्याने अनेक फायदे होतात. तुम्हीदेखील तुळशीच्या पानांचा वापर करून पाहू शकता.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी