Cumin And Ajwain Benefits जिरे आणि ओवा खाल्ल्याने दूर होतात हे 5 आजार, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत 

तब्येत पाणी
Updated Apr 09, 2023 | 19:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cumin And Ajwain good for health जिरे आणि ओव्याचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. यामुळे अनेक आजार बरे होतात. पण यासाठी तुम्हाला याचे सेवन करण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे.

जिरे आणि ओव्याबरोबर खाण्याचे अनेक फायदे आहेत
Benefits of eating Cmin and Celery  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक घराघरातील स्वयंपाकाघरात मसाल्याच्या डब्ब्यात जिरे आणि ओवा असतोच असतो. हे जिन्नस केवळ अन्नाचा सुगंधच वाढवत नाहीत तर जेवण चविष्ट बनवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो.
  • जिरे आणि ओव्याचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
  • तुम्हाला याचे सेवन करण्याची योग्य पद्धत माहीत असणे आवश्यक आहे.

Benefits of eating Cumin and Celery  प्रत्येक घराघरातील स्वयंपाकाघरात मसाल्याच्या डब्ब्यात जिरे आणि ओवा असतोच असतो. हे जिन्नस केवळ अन्नाचा सुगंधच वाढवत नाहीत तर जेवण चविष्ट बनवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. रोज स्वयंपाकात वापरले जाणारे हे मसाले आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत याची तुम्हाला फारशी कल्पना नसेल. जिरे आणि ओव्यामध्ये काळे मीठ मिसळून खाल्ल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. या सर्व गोष्टींचे मिश्रण औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याच्या सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

अधिक वाचा : घरी तयार करा डी टॅन फेस पॅक

जिर्‍याबद्दल बोलायचे झाले तर त्यात फायबर, लोह, तांबे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज, झिंक आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. दुसरीकडे, जर आपण ओव्या बद्दल बोललो तर त्यात भरपूर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते. या दोन्हीबरोबर, काळे मीठ देखील पोषक तत्वांच्या बाबतीत मागे नाही. त्यात सोडियम, सल्फेट आणि लोह आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने काळे मीठ हे जिरे आणि ओव्याबरोबर खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया त्यांचे सेवन करण्याचे फायदे आणि पद्धती.

वजन कमी होते

वाढत्या वजनाच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत. वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काळे मीठ जिरे आणि ओव्यासोबत खा. फायबर युक्त जिरे आणि ओवा वजन कमी करण्यास मदत करतात. 

अधिक वाचा : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला

गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते

जर तुम्ही गॅस आणि अपचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही जिरे, ओवा आणि काळे मीठ एकत्र करून त्याचे सेवन करू शकता. याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो. फायबर युक्त जिरे, ओवा आणि काळे मीठ हे गॅस आणि अपचन दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

दातांसाठी फायदेशीर 

जिरे, ओवा आणि काळे मीठ या तिन्हीमध्ये कॅल्शियमची भरपूर मात्रा उपलब्ध आहे. जे दातांसाठी खूप फायदेशीर आहे. दात मजबूत करण्याबरोबरच तोंडातून येणारी दुर्गंधही दूर होते. याची पावडर बनवून नियमित दात घासा, फरक जाणवेल. 

अधिक वाचा : ​बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट, शेतीचे नुकसान

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जिरे, ओवा आणि काळ्या मिठाचे सेवन करणे गरजेचे आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे व्हायरस आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी