7 दिवस दररोज खा फक्त 3 खजूर होतील आश्चर्यकारक फायदे

eating dates benefits in marathi: आपल्यापैकी अनेकजण हे कधी-कधी खजूर खातात. मात्र, दररोज खजूर खाल्ल्याने त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 

Dates benefits for health: खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे खूपजण विचार करत असातत की, खजूर आरोग्यासाठी चांगले नाहीये. पण हे गोड फळ भरपूर पोषक तत्वांनी युक्त असे असतात. त्यामुळेच खजूर हे एक निरोगी नाश्ता ठरते. खजूर हे अशा सुका मेव्यांपैकी एक आहे ज्यात तुमचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची क्षमता असते. खजूर हे औषधीय गुणधर्म वाढवण्याचे काम करते आणि त्यामुळेच अनेक आजारांवर ते औषध म्हणून वापरले जाते. खजूर हे थोड्या प्रमाणात खाल्ल्याने त्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्यासाठी होतात. (benefits of eating dates everyday read in marathi)

दररोज किती खजूर खावे? 

अभ्यासात असे समोर आले आहे की, खजूरामध्ये सेलेनियमसह 15 खनिज असतात. जे कर्करोगाशी लढण्यासाठी प्रभावी असतात. त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतात. खजूरामध्ये 23 अमिनो अ‍ॅसिड आणि फॅटी अ‍ॅसिड्स असतात. या फायद्याचा लाभ घेण्यासाठी दररोज तीन खजूर खाणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

ह्रदय निरोगी राहते

Pubmed च्या मते, खजूर हे ह्रदयासाठी खूपच फायदेशीर आणि आरोग्यदायक मानले जाते. खजूरामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म धमनीच्या पेशींमधून कोलेस्ट्रॉल काढण्यास मदत करतात. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांच्यासारखे आजार होत नाहीत.

हे पण वाचा : लहान मुलांना स्ट्रॉबेरी नेमकी कधी द्यावी?​

मजबूत हाडे

खजूरमध्ये असलेले मॅग्नेशियम, सेलेनियम, कॉपर आणि मॅगनीज हे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. यासोबतच खजूरमध्ये व्हिटॅमिन के सुद्धा जास्त असते जे रक्त घट्ट करण्यासाठी आणि हाडांसाठी उपयुक्त असते.

मेल इनफर्टिलिटी

एनसीबीआयच्या मते, खजूर हे प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतात. खजूर खाल्ल्याने शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्या वाढते. खजूर हे प्रजनन क्षमतेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वोत्तम नैसर्गिक फळांपैकी एक आहे.

हे पण वाचा : चुकूनही बनवू नका सिक्स पॅक अ‍ॅब्स, अन्यथा...​

मेंदू निरोगी

खजूरचे नियमित सेवन मेंदूला तणाव आणि जळजळ होण्यापासून वाचवण्यास अतिशय प्रभावी आहे. खजूर नियमित खाल्ल्याने तुम्हाला न्यूरोडीजेनेरेटीव्ह, मेंदूच्या संबंधित आजार होण्यापासून रोखते. याच्यासोबतच तुमची स्मरणशक्ती सुद्धा वाढते. 

कॅन्सरपासून बचाव

दररोज खजूर खाल्ल्याने अनेक फायदे होत असतात. खजूरात असलेले पोषक तत्त्वे हे कोलन कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती

दररोज खजूर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तसेच मनुष्य निरोगी राहतो आणि त्याला दिवसभर काम केल्यानंतरही थकवा जाणवत नाही. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या औषधांचा किंवा खाद्यपदार्थ घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी