Khajoor Benefits: खजूर खाल्ल्याने मिळतात 'हे' कमालीचे फायदे, खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

तब्येत पाणी
Updated Mar 25, 2023 | 17:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Benefits : चांगल्या आरोग्यासाठी निरोगी आणि पोषक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. भाज्या आणि फळांबरोबरच खजूर सारख्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश केल्यास चांगले फायदे मिळतात. रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यामुळे खूप मोठा फायदा होतो. खजूर खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ.

प्रातिनिधिक छायाचित्र
खजूर खाण्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या रमजानचा महिना चालू असल्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात खजूर आले आहेत.
  • खजूर उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जातात.

Benefits of Eating Dates: निरोगी जिवनशैलीसाठी, नियोजित वेळेमध्ये झोपण्या-उठण्याच्या सवयींबरोबरच चांगला आहार घेणे गरजेचा आहे. तसेच तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सकस आणि संतुलित आहार देखील आवश्यक आहे. ज्यामध्ये भाज्या, फळं, धान्य यांसोबत ड्रायफ्रूट्स पर्यंत सर्वांचा समावेश होतो. ड्रायफ्रूट्समुळे शरीरारला अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे रोज सकाळी नियमीत बदाम (Almond), आक्रोड (Walnut) आणि खजूर (Dates) जरूर खायला हवी. सध्या रमजानचा महिना चालू असल्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात खजूर आले आहेत. त्यामुळे या निमित्ताने खजुराचे सेवन करून उपवास सुद्धा खोलता येतो. 

अधिक वाचा:​ 'या' दिशेला बसून पूजा करणे शुभ मानले जाते,पण करू नका या चुका

चवीला गोड असणाऱ्या खजुरामध्ये अनेक पोषक घटक असतात. खजूर उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जातात. खजूर खाल्ल्याने पोटाची समस्या, वात आणि पित्त ई. समस्या कमी होतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने खूप फायदे होतात. मात्र, खजूर खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, कारण चुकीच्या पद्धतीने खजूर खालल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

आम्ही इथे तुम्हाला खजूर खाण्याचे फायदे आणि ते कसे खावे याबद्दल सांगणार आहोत.

खजूर खाण्याचे फायदे 

निरोगी शरीरासाठी खजुराचे सेवन योग्य मानले जाते. मुळात खजुरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जे हाडे मजबूत बनवण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच यात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक देखील भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. खजूर खाण्याचे फायदे खालील प्रमाणे - 

अधिक वाचा : ​Ramadan 2023: रमजानमध्ये उपवास केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला होतो मोठा फायदा

1. हृदय विकार 

हृदयाच्या आरोग्यासाठीही खजूर खाणे खूप फायदेशीर आहे. खजूरातील पोषक गुणधर्मांमध्ये हृदय मजबूत आणि निरोगी बनवण्याचे सामर्थ्य आहे. खजूर खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारते.

2. कोलेस्टेरॉल

कोलेस्टेरॉलची वाढती पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर एक उत्तम पर्याय ठरू शकतो. दररोज खजुराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन निरोगी कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. 

3. पुरुष आणि महिलांमध्ये लैंगिक ऊर्जा 

खजूर खाल्ल्याने महिला आणि पुरुषांमध्ये लैंगिक शक्ती वाढते. खजूर खाल्ल्याने चांगले लैंगिक कार्य करण्यात खूप मदत होते.

4. मानसिक आरोग्य 

खजूरामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहते. खजुराचा मनावर ही चांगला परिणाम होतो. मेंदूचा विकास आणि मेंदूचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका खजूर निभावते.

5. थकवा दूर होतो

खजूर खाल्ल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. खजूर हे पौष्टिक आणि उर्जेने भरलेले ड्रायफ्रूट आहे, जे नियमितपणे खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. 

6. बद्धकोष्ठतेपासून आराम

खजूर खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. केवळ बद्धकोष्ठताच नाही तर अपचन, गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्यांवर खजूर अत्यंत गुणकारी असे औषध मानले जाते.

अधिक वाचा : ​त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय, जाणून घ्या कोणती आहे 'ही' औषधी वनस्पती

खजूराचे हे वरील फायदे तर आहेतच, पण याबरोबरच खजूराच्या सेवनाने हाडे मजबूत होतात, रक्तदाब नियंत्रणात येते, अॅनिमियापासून आराम मिळतो, तसेच वजनावर देखील नियंत्रण करता येते. खजूर मूळव्याधसारख्या विकरांसाठी देखील गुणकारी आहे, गरोदरपणात खजुराचे सेवन खूप फायदेशीर आहे, तसेच त्वचा आणि केसांसाठीदेखील खूप चांगले मानले जाते.

खजूर खाण्याची योग्य पद्धत

खजुराचे झटपट परिणाम दिसण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाण्याचा सल्ला देण्यात येतो. तत्पूर्वी खजुराच्या बिया काढून त्या रात्रभर पाण्यात भिजून ठेवाव्यात, भिजवलेले खाजफुर आरोग्यासाठी खूप चांगले असते. दररोज भिजवलेले 2 ते 4 खजूर खा. नाहीतर, तुमचे वजन वाढू शकते. नियोजित आणि प्रमाणात खजूर खाल्ल्याने वजन वाढणार नाही आणि आरोग्यावर ही त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. 

(टीप - सदर लेख तुमच्या सामान्य माहितीसाठी देण्यात आला असून, आरोग्यविषयक कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला विचारात घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी