Makar Sankranti 2020: या मकरसंक्रांतीला खा तीळ आणि जाणून घ्या तीळ खाण्याचे फायदे 

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तिळ खाण्यासाठीही गरजेचं असते.

sesame
या मकरसंक्रांतीला खा तीळ आणि जाणून घ्या तीळ खाण्याचे फायदे  

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तिळ खाण्यासाठीही गरजेचं असते. धार्मिक कारणास्तव म्हणा किंवा आरोग्याच्या आधारावर म्हणा, तीळ खाणे खूप फायदेशीर आहे. मकर संक्रांतीवर तिळांचा वापर खूप होतो आणि तीळ प्रत्येक गोष्टीत समाविष्ठ करणं ही आवश्यक मानलं जातं.  अंघोळीच्या पाण्यापासून सूर्याला पाणी अर्पण करणं, पूजा आणि जेवण्यात तिळाचा प्रयोग आवश्यक आहे. तिळाशिवाय मकरसंक्रांती अपूर्ण असते. 

संक्रातीच्या दिवशी तीळ गुळ खाल्ल्यानंतर काहीही खाऊ शकता. अशातच तिळाला इतकं महत्त्व का आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. यामुळेच मकर संक्रांती अनेक ठिकाणी तीळ संक्रांती म्हणूनही ओळखली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं महत्त्व आरोग्याशी संबंधित आहे.

तीळ कॉपर, मॅग्निशिअम, आयरन, फास्फोरस, जिंक, प्रोटीन, कॅल्शिअम, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायट्रेडनं परिपूर्ण असते. अॅन्टिऑक्सिडेंट्स असल्यानं तीळ काही आजारांवर उपचारात मदत करतात. तीळ पचन देखील सुधारते. 

तीळ खाण्याचे फायदे 

कोलेस्ट्रॉल कमी करतं 

तिळात मोनो- सॅचुरेटेड फॅटी अॅसिड असतं आणि हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मदत करतं. हे हृदय देखील सुरक्षित ठेवतं. तिळात सेसमीन नावाचं अॅन्टिऑक्सिडेंट असतं आणि हे तत्त्व शरीरात कॅन्सर पेशी वाढण्यास प्रतिबंधित करते.

ओमेगा थ्री आणि व्हिटामिन्सनी भरलेलं तीळ हे डिप्रेशनवर लढण्यास मदत करते. तीळ मेंदूला सक्रिय करतो. कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, जिंक आणि सेलेनियम सारख्या घटकांनी परिपूर्ण असलेलं तीळ हाडं मजबूत करतं आणि स्नायू आणि हृदय निरोगी करतं. 

हवामान अनुकूल तीळ

तिळात आहारातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड असतात आणि मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात. मकरसंक्रांतीच्या वेळी हवामान बरेच थंड असते. तीळ उबदार आहे आणि शरीराचे तापमान कमी होण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीर उबदार ठेवते. यामुळे शरीरात उर्जा पातळी कायम राहते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी