Honey Health Benefits: 'हनी है तो हेल्थ है'...असे करा मधाचे सेवन, हृदयविकार आणि डायबेटीजमध्ये होईल जबरदस्त फायदा

Health Tips : अनेक आजारांमध्ये मधाचा वापर होतो. मधाचे योग्य पद्धतीने नियमित सेवन केल्यास आश्चर्यकारक फायदे मिळतात. मध खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. मधामध्ये प्रचंड पोषक तत्त्वे असतात. त्यांचा फायदा वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारख्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. मधामुळे फास्टिंग शुगर नियंत्रणात राहते. त्याचबरोबर शरीरातील चांगल्या कोलस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

Honey Benefits
मधाचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • मध हे आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर
  • मधामध्ये प्रथिने, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
  • अनेक गंभीर आजारांमध्ये मध उपयोगी

Honey Benefits for Health: नवी दिल्ली : मधाचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. मध हे औषधी गुणांनी समृद्ध असते. त्यामुळेच मध (Honey) हे आरोग्यासाठी (Health) प्रचंड फायदेशीर असते. अनेक आजारांमध्ये मधाचा वापर होतो. मधाचे योग्य पद्धतीने नियमित सेवन केल्यास आश्चर्यकारक फायदे (Benefits of honey) मिळतात. मध खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. मधामध्ये प्रचंड पोषक तत्त्वे असतात. मधाला पारंपारिक आहारपद्धतीत खूप मोठे महत्त्व देण्यात आलेले आहे. त्यांचा फायदा वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहासारख्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. मधामध्ये प्रथिने, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. परिणामी मधाच्या सेवामुळे हृदयविकार (Heart Disease) आणि मधुमेहासारख्या (Diabetes)आजारांचा धोका दूर होतो. आरोग्याचे हे फायदे घेण्यासाठी मधाचे सेवन कसे करायचे ते पाहूया. (Benefits of honey in diabetes and heart disease read in Marathi)

अधिक वाचा  : लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने

मधावरील संशोधन

टोरंटो युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार, मधाचे फायदे समोर आले आहेत. यानुसार मध कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.या संशोधनानुसार, मधामुळे फास्टिंग शुगर नियंत्रणात राहते. त्याचबरोबर शरीरातील चांगल्या कोलस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. 

मधुमेहावरील नियंत्रण

रक्तातील साखर वाढल्यामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार होतो. त्यामुळेच मधासारखा गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेहात त्रास तर होणार नाही ना असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. मात्र मधामुळे मधुमेह नियंत्रण ठेवण्यास मदत होते. कारण मधामध्ये असलेले पोषक तत्व ग्लुकोज नियंत्रित करण्याचे काम करतात. शिवाय गोड खाल्ल्याचा आनंददेखील मिळतो. 

अधिक वाचा  : किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद

कोलेस्ट्रॉलवरील नियंत्रण 

मधामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. शरीरात खराब कोलस्ट्रॉल वाढल्यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्हाला कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटत असेल तर एक चमचा मधासोबत कच्चा लसूण खाणे खूप फायदेशीर ठरते. मधामुळे शरीरातील दोन्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतात. याचा फायदा ह्रदयाच्या आरोग्यासाठी होतो. 

अधिक वाचा  :नवरा-बाययकोच्या नात्याची कमकुवत नाळ घट्ट करायची आहे?

मधाचे सेवन कसे करावे?

रोज मधाचे सेवन केल्याने मोठा फायदा होतो. दररोज एक चमचा म्हणजे साधारण 35-40 ग्रॅम मध सेवन करणे फायदेशीर आहे. एरवी आपण सर्वजण चहा आवडीने पीत असतो. त्यात साखरेचा वापर होत असतो. त्याऐवजी जर चहामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केला तर त्याचा खूपच फायदा होईल. 

मधाचे फायदे

फक्त मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण यामध्येच मध फायदेशीर आहे असे नाही तर इतरही आजारांमध्ये याचा उपयोग होतो. पचनाच्या समस्या, सर्दी, घशाच्या समस्या, लठ्ठपणा यामध्येदेखील मध फायदेशीर असते. केस, त्वचा आणि रोगप्रतिकारशक्ती यासाठीही मध फायदेशीर असते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी