हसणे हा पण आहे उपचार; जाणून घ्या लाफ्टर थेरपीचे फायदे

benefits of laughter therapy : हसणे हा पण एक उपचार आहे. दिवसाची सुरुवात उपचार म्हणून विशिष्ट पद्धतीने मुद्दाम हसून करण्याने दिवस आनंदात जातो. अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

benefits of laughter therapy
हसणे हा पण आहे उपचार; जाणून घ्या लाफ्टर थेरपीचे फायदे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • हसणे हा पण आहे उपचार; जाणून घ्या लाफ्टर थेरपीचे फायदे
  • दिवसाची सुरुवात उपचार म्हणून विशिष्ट पद्धतीने मुद्दाम हसून करण्याने दिवस आनंदात जातो
  • लाफ्टर थेरपीने आजार बरे होण्यास मदत होते

benefits of laughter therapy : हसणे हा पण एक उपचार आहे. दिवसाची सुरुवात उपचार म्हणून विशिष्ट पद्धतीने मुद्दाम हसून करण्याने दिवस आनंदात जातो. अनेक आजार बरे होण्यास मदत होते. यासाठीच लाफ्टर क्लबच्या माध्यमातून अनेकजण दररोज सकाळी उद्यानात अथवा मैदानात एकत्र जमून मुद्दाम हसून स्वतःवर उपचार करून घेतात. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. काम करण्यासाठी नवा उत्साह संचारतो.

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

लाफ्टर थेरपीचे फायदे

  1. ऑक्सिजन : मुद्दाम हसून स्वतःवर उपचार करून घेतल्याने अर्थात लाफ्टर थेरपी केल्याने शरीरात जास्तीत जास्त ऑक्सिजन नकळत घेतला जातो. या ऑक्सिजनमुळे शरीरातील सर्व अवयवांना त्यांचे काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते. रक्ताभिसरण सुरळीत होते. हृदय, फुफ्फुस, सर्व स्नायू यांची कार्यक्षमता वाढते. 
  2. तणाव : मुद्दाम हसून स्वतःवर उपचार करून घेतल्याने अर्थात लाफ्टर थेरपी केल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. शरीरावरील नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक प्रभाव वाढतो. लाभदायी असलेली संप्रेरके शरीरात निर्माण होतात. यामुळे दिवसभराच्या कामकाजासाठी उत्साह संचारतो. 
  3. वजन : मुद्दाम हसून स्वतःवर उपचार करून घेतल्याने अर्थात लाफ्टर थेरपी केल्याने कॅलरी बर्न होतात. वजन कमी करण्यास मदत होते. दररोज दहा ते पंधरा मिनिटे लाफ्टर थेरपी केल्यामुळे ४० कॅलरी बर्न होतात.
  4. मूड सुधारतो : मुद्दाम हसून स्वतःवर उपचार करून घेतल्याने अर्थात लाफ्टर थेरपी केल्याने मूड सुधारतो. सकारात्मकता वाढते. काम यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यास मदत होते. उत्साह वाढतो.
  5. वेदना : मुद्दाम हसून स्वतःवर उपचार करून घेतल्याने अर्थात लाफ्टर थेरपी केल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. दुःख कमी होण्यास अथवा विसरून जाण्यास मदत होते. दुःख-वेदना यामुळे शरीराला त्रास होतो. हा त्रास लाफ्टर थेरपीच्या माध्यमातून कमी करण्यासाठी मदत होते. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी