त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय, जाणून घ्या कोणती आहे 'ही' औषधी वनस्पती

benefits of Licorice root: त्वचेच्या संदर्भातील समस्यांवर औषधी वनस्पती खूप फायदेशीर आहे. औषधी वनस्पतीच्या सहाय्याने त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत होते. जाणून घ्या कसे...

benefits of Licorice root mulethi jeshthamadh good for skin disease read uses in marathi
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय, जाणून घ्या कोणती आहे 'ही' औषधी वनस्पती (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औषधी वनस्पतीचा वापर करा अन् त्वचेच्या समस्या दूर करा
  • जाणून घ्या कोणती आहे ही औषधी वनस्पती आणि कसा कराल उपयोग

jeshthamadh uses for skin problem read in marathi: आयुर्वैदिक वनस्पतींचा योग्य वापर केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. अशीच एक आयुर्वैदिक वनस्पती म्हणजे मुळेठी आहे. मुळेठीला मराठीत ज्येष्ठमध म्हणतात. याच्या मदतीने तुम्ही त्वचेच्या संदर्भातील काही समस्या दूर करु शकता. जाणून घ्या त्याचा वापर नेमका कसा करावा. (benefits of Licorice root mulethi jeshthamadh good for skin disease read uses in marathi)

मुळेठी म्हणजेच ज्येष्ठमध (Licorice root) ही एक उत्कृष्ट आयुर्वैदिक औषधी वनस्पती आहे आणि ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. एलर्जी, घसा खवखवणे, घशाला सूज, बंद नाक यासारख्या समस्यांवर ज्येष्ठमध हे रामबाण उपाय आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स, ग्लायसिरिझिन अ‍ॅसिड, अँटीबायोटिक्स सारखे आवश्यक पोषक आणि औषधी गुणधर्म असतात.

हे पण वाचा : गरोदर असताना उपवास करावा की नाही?

आयुर्वेदात ज्येष्ठमध (Licorice root) पावडरचा वापर श्वसनाच्या संबंधित समस्या, लठ्ठपणा, त्वचेच्या संबंधित एलर्जी, सांधेदुखी यासारख्या समस्यांवर उपचारासाठी केला जातो. आयुर्वैदात या चूर्णाला यष्टिमधू म्हटले जाते. त्वचेच्या संबंधित समस्या दूर करण्यासाठी ज्येष्ठमध खूप फायदेशीर आहे. याचे सेवनच नाही तर त्वचेवर त्याचा वापर केल्याने निरोगी, मुलायम आणि चमकदार त्वचा मिळण्यास मदत होते. आता हा प्रश्न आहे की, ज्येष्ठमधाचा वापर नेमका कसा करावा? जाणून घेऊयात याच संदर्भात.

हे पण वाचा : लहान मुलांना घामोळ्या होतात? वाचा कारणे आणि उपाय

How to use Licorice Root or Mulethi or Jeshthamadh read in marathi

चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी

चेहऱ्यावर काळे डाग, टॅनिंग आणि पिगमेंटेशनमुळे तुम्ही त्रस्त असाल तर चेहऱ्यावर लिकोरिस पावडर लावल्याने तुमची समस्या लवकर दूर होऊ शकते. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी हे खूप प्रभावी असे आहे.

हे पण वाचा : दगाबाज रे.... या कारणांमुळे पार्टनरला फसवतात मुलं-मुली

फेस मास्क किंवा फेस पॅक

जर तुम्ही फेस मास्क किंवा फेस पॅक म्हणून ज्येष्ठमधाचा नियमित वापर करत असाल तर तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या, बारिक रेषा दूर होण्यास मदत होते.

सनबर्न

अनेकांना कडाक्याच्या उन्हामुळे त्वचेच्या समस्या जाणवतात. ज्यामुळे त्वचेवर जळजळ, लालसरपणा आणि काळे डाग पडतात. सूर्यप्रकाशामुळे त्वचेला होणारे हे नुकसान त्वरीत भरून काढण्यासाठी ज्येष्ठमध वापरणे खूप प्रभावी आहे.

हे पण वाचा : या पत्त्यावर तिसरा 8 अंक तुम्हाला दिसला का? शोधा बरं

How to use Licorice Root or Mulethi or Jeshthamadh on skin read in marathi

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तसेच चमकदार बनवण्यासाठी ज्येष्ठमध वापरणे खूप सोपे आहे. यासाठी एका वाटीत एक चमचा ज्येष्ठमधाची पावडर, त्याच प्रमाणात मध घ्या. हे मिश्रण एकत्र करा. त्यानंतर त्यात लिंबाचा रस किंवा गुलाबपाणी टाका. हे मिश्रण फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे सुकवा. एकदा सुकल्यावर मग ते पाण्याने धुवा. एका आठवड्यात रात्री झोपण्यापूर्वी 2 ते 3 वेळा याचा वापर करा. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी