आंबा खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे

Benefits Of Mango, Anti Cancer Properties In Mango, Mango Beneficial For Eyes : उन्हाळा आला की आंबा हे फळ बाजारात दाखल होते. आंब्याला फळांचा राजा म्हणतात. एवढा मान देण्याएवढे आंबा या फळात खास काय आहे हे जाणून घेऊ...

Benefits Of Mango, Anti Cancer Properties In Mango, Mango Beneficial For Eyes
आंबा खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आंबा खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे
  • आंबा खाण्याने डोळ्यांना फायदा
  • आंब्यात आहेत अँटी कॅन्सर प्रॉपर्टी

Benefits Of Mango, Anti Cancer Properties In Mango, Mango Beneficial For Eyes : उन्हाळा आला की आंबा हे फळ बाजारात दाखल होते. आंब्याला फळांचा राजा म्हणतात. एवढा मान देण्याएवढे आंबा या फळात खास काय आहे हे जाणून घेऊ...

भारतीय आंब्याचे १० प्रकार

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

आंबा खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. जाणून घ्या हे फायदे...

  1. अँटी कॅन्सर प्रॉपर्टी : कॅन्सर अर्थात कर्करोगाला प्रतिबंध करणारे घटक आंबा खाल्ल्यावर पोटात जातात. नियमित आणि मर्यादीत प्रमाणात आंबा खाल्ल्यास कॅन्सरशी संबंधित अनेक पेशींना नैसर्गिकरित्या प्रतिबंध करण्यासाठी शरीर सक्षम होते. या कामासाठी शरीराला आंबा हे फळ मदत करते. 
  2. डोळ्यांना फायदा : आंबा या फळात अ जीवनसत्व अर्थात ए व्हिटॅमिन असते. या व्यतिरिक्त आंब्यात ल्युटिन (lutein) आणि झेक्सॅन्थिन (Zeaxanthin) हे दोन घटक असतात. ल्युटिन (lutein) आणि झेक्सॅन्थिन (Zeaxanthin) हे दोन घटक डोळ्यांचे घातक प्रकाशामुळे होणाऱ्या त्रासांपासून रक्षण करतात. तर ए व्हिटॅमिन डोळ्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे. आंबा खाल्ल्यामुळे हे घटक पोटात जातात आणि डोळ्यांना भरपूर फायदा होतो.
  3. पचनक्रिया सुधारते : नियमित आणि मर्यादीत प्रमाणात आंबा खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 
  4. हृदयाला लाभदायी : आंबा हे फळ नियमित आणि मर्यादीत प्रमाणात खाल्ल्यास हृदय निरोगी राहून उत्तम क्षमतेने कार्यरत राहते. 
  5. आजारांना प्रतिबंध : आंबा हे फळ माणसाला रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. यामुळे आंबा मर्यादीत प्रमाणात खाल्ल्यास आजारांना प्रतिबंध होण्यास मदत होते. आंब्यातील व्हिटॅमिन बी, ई आणि कॉपर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात.
  6. त्वचेसाठी लाभदायी : आंबा नियमित आणि मर्यादीत प्रमाणात खाल्ल्यास त्वचा उजळते. शरीराला व्हिटॅमिन ए, सी, ई मिळाल्यामुळे त्वचेला लाभ होतो. 

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी