benefits of putting oils in belly : भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना तेलाने मसाज केले जाते. यामध्ये डोके, हात-पाय, नाभी यांचा समावेश आहे. सध्या अनेकजण नाभीत तेल टाकतात आणि त्याचे फायदे सुद्धा अनेक आहेत. प्राचीन मान्यतांनुसार, नाभीत तेल ओतल्याने मज्जासंस्था चांगली आणि संतुलित होते. इतकेच नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?
असे मानले जाते की, नाभीत तेल लावल्याने पोटदुखीच्या समस्येपासून सुटका होते. आले, मोहरीचे तेल मिसळून ते नाभीत टाका. यामुळे पोट फुगणे, उलट्या यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
नाभीत तेल लावल्याने नाभीतील घाणही निघून जाते. नाभी हा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी अगदी सहज घाण जमा होऊ शकते आणि ती घाण काढणे तसं सोपं नाहीये. त्यामुळे नाभीत तेल लावल्याने तेथे असलेली घाण निघून जाण्यास मदत होते.
नाभीत तेल लावल्याचा त्वचेच्या आरोग्याचाही संबंध जोडला आहे. यामुळे त्वचेवर एक तेज पहायला मिळते.
नाभीत तेल टाकल्याने सांधेदुखीपासून मुक्तता सुद्धा मिळते.
नाभीला तेल लावल्याने मन शांत होण्यासही मदत होते असे मानले जाते.
हे पण वाचा : हाता-पायाला मुंग्या येतात? जाणून घ्या घरगुती आणि रामबाण उपाय
चेहऱ्यावर तेज हवं असेल तर नाभीत नारळाचे किंवा बदामाचे तेल लावू शकता. यामुळे त्वचा तेजस्वी होते आणि चमकदार दिसते. रोज रात्री नाभीत नाराळाचे किंवा बदामाच्या तेलाचे तीन थेंब टाकू शकता.
हे पण वाचा : व्यायाम करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी ऑलिव ऑईलचा वापर करु शकता. ऑलिव ऑईलचे तीन थेंब नाभीत टाकू शकता.
हे पण वाचा : उन्हाळ्यात या फुलाचे पाणी तुमच्यासाठी ठरेल संजीवनी
नाभीत मोहरीचे तेल लावल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळते. फाटलेले ओठ, दृष्टी चांगली होण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी आणि त्यासोबतच डोकेदुखी दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब नाभीत टाकू शकता.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)