Benefits of turmeric: जाणून घ्या आरोग्यदायी हळद खाण्याचं योग्य ‘प्रमाण’, तरच मिळेल फायदा

तब्येत पाणी
Updated Nov 25, 2019 | 18:24 IST | टाइम्स नाऊ हिंदी

हळद आरोग्यासाठी खूप गुणकारी मानली जाते. हळद खावी असं नेहमीच सांगितलं जातं. मात्र आपल्याला माहितीय का? एका दिवसात किती प्रमाणात हळद खावी. जाणून घ्या याबद्दल...

Daily dose of turmeric
जाणून घ्या आरोग्यदायी हळद खाण्याचं योग्य ‘प्रमाण’  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

 • हळदीचे खूप आरोग्यदायी फायदे आहेत
 • हळदीच्या फायद्यासाठी ती योग्य प्रमाणात घेणं आवश्यक
 • प्रत्येक व्यक्तीनं आपल्या वजनाच्या प्रति किलो तीन मिलीग्रॅम हळदीचं सेवन करावं

मुंबई: हळदचा उपयोग सूज कमी करणारी आणि कँसर, फुफ्फुसाचे आजार दूर करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. एव्हढंच नव्हे तर कॅलेस्ट्रॉल, ऑर्थरायटिस आणि त्वचेसंदर्भातील अनेक आजारांवर हळदीचा वापर खूप उपयुक्त ठरतो. आपल्या देशातील प्रत्येक घरात हळदीचा दररोज स्वयंपाकात वापर केला जातो. हळदीचं जेव्हढं प्रमाण आपल्याला आवश्यक असतं त्यापेक्षा खूप कमी प्रमाण आपण दररोज आहारात घेत असतो. हळद ही अँटी इंफ्लेमेंटरी, अँटी-एलर्जीक आणि अँटी-ऑक्सिडेंट आणि इम्युनोमोड्यूलेशन गुणांनी परिपूर्ण असते. त्यामुळे दररोज आपल्या आहारात हळदीचा अवश्य समावेश असावा.

करक्यूमिनमुळे हळद ठरते खूप लाभदायक

हळदीमध्ये आढळणाऱ्या करक्यूमिनमध्ये औषधीय गुण असतात. मात्र हे हळदीमध्ये फक्त तीन टक्केच असते. म्हणून हळदीचा उपयोग अधिक केला तरच त्याचा फायदा होऊ शकतो. आजकाल बाजारात करक्यूमिन पावडर किंवा कॅप्सूल सुद्धा उपलब्ध आहेत. जेणेकरून शरीरातील समस्या सहजपणे दूर केल्या जावू शकतात. तर मग जाणून घ्या दररोज किती प्रमाणात हळद किंवा करक्यूमिनचा वापर करायला हवा ते...

हळदीचे फायदे जाणून घ्या –

 • हळदीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे गुण आहेत. इन्फेक्शन, एलर्जी आणि अंतर्गत जखम भरून काढण्यासाठी हळदीचा फायदा होतो.
 • हळद श्वासनलिकेत होणारी सूज कमी करण्याचं काम करते. अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिसमध्येही हळद फायदेशीर ठरते.
 • पिंपल्स किंवा फोडांवर हळद लावल्यानं ते बरे होण्यास मदत मिळते.
 • खोकला झाला असल्यास हळदीचा एक लहान तुकडा तोंडात ठेवल्यानं खूप आराम मिळतो.
 • जखम झाल्यास कांदा आणि हळद बारीक करून लावल्यानं जखम आणि आतील सूज कमी होते.
 • अंतर्गत जखम किंवा रक्त गोठलं असल्यास हळदीचं दूध पिल्यानं खूप फायदा होतो.
 • दात किंवा हिरड्यांमध्ये दुखापत झाली असेल तर हळद, मीठ आणि मोहरीचं तेल एकत्र मिसळून त्यानं दात, हिरड्यांवर मसाज करावी, फायदा होईल.
 • पोटातील जळजळ आणि अॅसिडिटीला दूर ठेवण्यासाठी हळद खूप फायदेशीर ठरते.

रोज खावी या प्रमाणात हळद –

कोलेस्ट्रॉल: दररोज दिवसातून दोन वेळा ७०० मिलीग्रॅम हळद (अर्काच्या स्वरूपात घ्यावी).

त्वचाविकारावर: ५०० मिलीग्रॅम

ऑस्टियोआर्थराइटिस: ५०० मिलीग्रॅम हळद सेवन करावी

अस्थमा किंवा अॅलर्जीमध्ये: ७०० मिलीग्रॅम हळद घ्या

अंतर्गत जखम: ५०० मिलीग्रॅम हळद

डब्ल्यूएचओनुसार एका व्यक्तीनं आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलो तीन मिलीग्रॅम इतकी हळद दररोज आपल्या आहारात घ्यावी. उदाहरणार्थ – म्हणजे जर आपलं वजन ७० किलो असेल तर ७० गुणीले ३ असे २१० मिलीग्राम हळदीचं सेवन दररोज करावं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी