Best Food for Spine: आपल्या शरीरात हाडांचं (Bones) अनन्यसाधारण महत्त्व आहे. हाडांमुळेच आपल्या शरीराचं स्ट्रक्चर (Body structure) तयार होतं. जर हाडं कमकुवत (weak bones) होऊ लागली, तर आपल्या शरीरातील काही भागांना वेदना व्हायला सुरुवात होते आणि अशक्तपणाही (weakness) येऊ लागतो. शरीरासाठी माकडहाड हा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो. मात्र तिशीनंतर हा भाग काहीसा सैल पडू लागतो. त्याची क्षमता कमी होऊ लागते. जर शरीरात पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम आणि इतर पोषक घटक गेले नाहीत, तर हाडांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ लागतो. वयाच्या तिशीत शरीर नैसर्गिकरित्या फिट असतं. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीदेखील याच वयात लागत असतात. त्यामुळे तिशीत असताना जर खाण्यापिण्याच्या पदार्थांकडे लक्ष दिलं नाही, तर चाळीशीनंतर त्याचे परिणाम शरीरावर जाणवायला सुरुवात होते. त्यासाठी तिशीत काही विशिष्ट पदार्थांचं सेवन सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊया, असेच काही पदार्थ.
दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असतं. त्यामुळे आपली हाडं मजबूत राहायला मदत होत असते. त्यासाठी तुम्ही आहारात दूध, दही, चीज यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता. मात्र तुम्ही पीत असलेलं दूध लो फॅट असेल, याची खातरजमा करणं आवश्यक आहे. अन्यथा, तुमचं वजन वाढायला सुरुवात होऊ शकते.
अधिक वाचा - Worst food for kidney: ‘हे’ पाच पदार्थ ठरतात किडणीसाठी विष, आजच करा डाएटमधून हकालपट्टी
तिशीतील तरुणांनी आपल्या आहारात वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचं सेवन करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. त्यामुळे हाडांचं आरोग्य सुधारायला आणि शरीर बळकट होण्यास मदत होते. रोजच्या आहारात तुम्ही आलं, हळद, दालचिनी आणि तुळस यासारख्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दिवसातून दोन वेळा हर्बल चहा पिणेही फायद्याचे ठरत असल्याचे सांगितले जाते.
हिरव्या भाज्यांना सुपरफूड असं म्हटलं जातं. त्यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचं मुबलक प्रमाण असतं. या भाज्या हाडांच्या आणि एकूणच शरीराच्या पोषणासाठी उत्तम मानल्या जातात. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ब्रोकली, केल, पालक यासारख्या भाज्यांचा समावेश केला, तर पाठीच्या मणक्यात सुरु असणारं इन्फ्लमेशन कमी होण्यास मदत होते. भविष्यात सुरू होणारा कंबरदुखीचा त्रासदेखील यामुळे कमी होऊ शकतो.
अधिक वाचा - तुमच्या हाता-पायाला मुंग्या येतात का? मग वेळीच व्हा सावध, ही आहे धोक्याची घंटा
जेव्हा आपल्या पाठिचा कणा कमकुवत होऊ लागतो, तेव्हा कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, खुबे दुखणे, चालताना त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. अनेकदा हात आणि पाय सुन्न झाल्याचाही अनुभव येऊ लागतो. तुम्ही सध्या तिशीत असाल, तर भविष्यातील आरोग्यावरील तरतूद म्हणून प्रोटिन आणि व्हिटॅमिनयुक्त आहाराचा समावेश करणं अत्यावश्यक आहे.
डिस्क्लेमर - मणक्याचं आरोग्य सुधारण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला अपेक्षित आहे.