कोरोना संकटात कोणता मास्क किती प्रभावी?

best mask for preventing covid19 डॉक्टरांशी केलेल्या चर्चेतून 'टाइम्स नाऊ मराठी'च्या टीमने सर्वोत्तम मास्क कोणता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

best mask for preventing covid19
कोरोना संकटात कोणता मास्क किती प्रभावी? 

थोडं पण कामाचं

 • कोरोना संकटात कोणता मास्क किती प्रभावी?
 • कोरोना संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी मास्क घालणे हा सर्वोत्तम उपाय
 • एन ९५ मास्क हा कोरोना संकटापासून वाचवणारा सर्वोत्तम मास्क

मुंबईः वाढत्या कोरोना संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी मास्क घालणे हा व्यावहारिक आणि शक्य असलेला सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे सातत्याने सरकारी यंत्रणा मास्क घालण्याचे आवाहन करत आहेत. पण नागरिक त्यांच्या खिशाला परवडणारे अथवा त्यांना आवडणारे असे वेगवेगळे मास्क खरेदी करुन वापरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांशी केलेल्या चर्चेतून 'टाइम्स नाऊ मराठी'च्या टीमने सर्वोत्तम मास्क कोणता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. best mask for preventing covid19

सध्या देशात प्रामुख्याने चार प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. सर्जिकल मास्क, फॅब्रिक मास्क (कापडाचा मास्क), एन ९५ मास्क आणि व्हॉल्व्ह मास्क. या चार प्रकारांपैकी एन ९५ मास्क हा कोरोना संकटापासून वाचवणारा सर्वोत्तम मास्क आहे. पण तो उपलब्ध नसल्यास सर्जिकल मास्क किंवा फॅब्रिक मास्क (कापडाचा मास्क) वापरावा; असे डॉक्टर सांगतात. सर्जिकल मास्क एकदा वापरला की कागदात गुंडाळुन बंद कचरा पेटीत टाकून द्यावा. फॅब्रिक मास्क (कापडाचा मास्क) ठराविक दिवस वापरल्यानंतर कागदात गुंडाळुन बंद कचरा पेटीत टाकून देण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. 

सामान्य नागरिक ज्यांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अथवा इतर कामांकरिता दररोज घराबाहेर पडावे लागते त्यांनी सर्जिकल मास्क किंवा फॅब्रिक मास्क (कापडाचा मास्क) वापरावा. दोन पेक्षा तीन पदरांचा मास्क जास्त सुरक्षित आहे, असेही डॉक्टर सांगतात. एन ९५ हा मास्क महाराष्ट्रात दर्जानुसार १९ ते ४९ रुपयांत तर दोन पदरी आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध आहे. जेनेरिक औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये सर्जिकल मास्क आणि फॅब्रिक मास्क (कापडाचा मास्क) ३ ते ४ रुपयांना उपलब्ध आहे.

डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कोविड केअर सेंटरचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी एन ९५ मास्क वापरावा. जर एन ९५ मास्क उपलब्ध नसेल तर सर्जिकल मास्क किंवा फॅब्रिक मास्क (कापडाचा मास्क) वापरावा. यातही तीन पदरांचे मास्क उपलब्ध असल्यास त्यांना प्राधान्य द्यावे; असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ज्यांना मास्क घातल्यावर गुदमरल्यासारखे होते त्यांनी व्हॉल्व्ह मास्क वापरावा. पण हा मास्क संसर्ग रोखण्यासाठी इतर मास्कच्या तुलनेत कमी सक्षम असल्याचे डॉक्टर सांगतात. व्हॉल्व्ह मास्क वापरल्यास श्वास घेणे सोपे होते. मास्कमध्ये हवा साठून राहात नसल्याने गुदमरल्याची भावना होत नाही. पण या मास्कचा फिल्टर कितीही चांगला असला तरी तो कोरोनापासून संरक्षण देण्यास सक्षम आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल; असे डॉक्टरांनी सांगितले. मास्क खराब झाला अथवा फाटला तर तातडीने नवा मास्क वापरा; असेही डॉक्टरांनी सांगितले. 

N95 mask how to use, एन 95 मास्क व्यवस्थित कसा घालाल

 1.  सर्वप्रथम मास्क निवडताना ‘R’ व ‘P’ यापैकी P मास्क निवडा, कारण हा जास्त परिणामकारक आहे.
 2.  मास्क घेण्याआधी आकाराकडे लक्ष द्या. मास्क नाकावरून घसरता कामा नये. मास्क नेहमी औषधाच्या दुकानातून किंवा ऑनलाईन खरेदी करा.
 3.  आपल्याला काही जुनाट रोग वा हृदयविकार असेल तर आधी डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क खरेदी करा. एन 95 मास्क घातल्याने आजारी व्यक्तींना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
 4.  मास्क व्यवस्थित बसण्यासाठी पुरुषांनी दाढी नीट ट्रिम करावी.
 5.  मास्क लावण्याआधी हात स्वच्छ धुवा. आधी मास्क नाकावर लावा आणि  नंतर दोऱ्या कानांमागे न्या.
 6.  एन 95 मास्क हा लहान मुलांसाठी योग्य नाही. त्यांच्यासाठी वेगळा पर्याय शोधा.
 7.  मास्क काढताना पट्टा खेचून मग मास्क काढा. समोरून मास्कला स्पर्श करू नका.
 8.  मास्क घालून डॉक्टरांकडे गेलात तर नंतर तो मास्क फेकून द्या. अन्यथा सैल होईपर्यंत हा मास्क आपण वापरू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी