उन्हाळ्यात ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ

Best Time For Drink Green Tea in summer : ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञ देत आहेत.

Best Time For Drink Green Tea in summer
उन्हाळ्यात ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उन्हाळ्यात ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ
  • ग्रीन टी पिण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
  • ग्रीन टी पिण्याचा अतिरेक टाळावा

Best Time For Drink Green Tea in summer : ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्षमता वाढविण्यासाठी नियमित प्यावी, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. पण सध्या उन्हाळा सुरू आहे. मे महिन्याचे दिवस आहे. असह्य उकडत आहे. या अशा वातावरणात ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञ देत आहेत. दररोज सकाळी ब्रश केल्यानंतर अनेकजण चहा किंवा कॉफी पितात. याच वेळी चहा किंवा कॉफी ऐवजी ग्रीन टी पिणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच रात्रीच्या जेवणाच्या दोन तास आधी एक कप ग्रीन टी प्यावा. थोडक्यात उन्हाळ्यात दिवसभरात जास्तीत जास्त दोन कप ग्रीन टी प्यावा. यातील एक कप सकाळी आणि एक कप रात्रीच्या जेवणाच्या दोन तास आधी प्यावा. 

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

अॅसिडिटीचा त्रास असेल अथवा ग्रीन टी मधील एखाद्या घटकाची आपल्याला अॅलर्जी असेल तर ग्रीन टी पिण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ग्रीन टी पिण्याचा अतिरेक टाळावा.

दिवसभरात एक किंवा दोन कपपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नये. ग्रीन टी मर्यादीत प्रमाणात प्यायल्यास आरोग्याला लाभदीय ठरते. पण ग्रीन टी पिण्याचा अतिरेक केल्यास शरीराचे गंभीर स्वरुपाचे नुकसान होण्याचा धोका असतो.

नाश्ता करण्याच्या आधी ग्रीन टी प्यायला तर खाल्लेले पदार्थ पचण्यास मदत होते. याच कारणामुळे रात्रीच्या जेवणआधी ग्रीन टी प्यायल्याने फायदा होतो. लक्षात ठेवा सकाळी ११ वाजण्याआधी आणि रात्री जेवणाच्या दोन तास आधी ग्रीन टी प्यावा. या वेळा उलटल्यानंतर ग्रीन टी पिणे टाळावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी