Yoga for Period: पीरियड क्रॅम्प्सपासून आराम मिळवण्यासाठी बेस्ट वॉल योगा पोज

तब्येत पाणी
Updated Apr 13, 2023 | 18:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yoga poses for Period: दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीत पीरियड क्रॅम्प्स नसावेत असे अनेक महिलांना वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशी आसने सांगणार आहोत जी पीरियड क्रॅम्प्स आणि पीसीओडीच्या समस्यांपासून आराम देतील. ही आसने भिंतीच्या मदतीने कमी वेळेत आणि सहज करता येतात.

Best wall yoga poses to get relief from period cramps
Yoga for Period: पीरियड क्रॅम्प्सपासून आराम मिळवण्यासाठी बेस्ट वॉल योगा पोज   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मासिक पाळीत पीरियड क्रॅम्प्स नसावेत असे अनेक महिलांना वाटते.
  • ही आसनं पीरियड क्रॅम्प्स आणि पीसीओडीच्या समस्यांपासून आराम देतील.
  • यामुळे तणाव आणि चिंता देखील कमी होते.

Wall yoga poses for Period: घराबाहेरच्या जबाबदाऱ्यांमुळे आपल्याकडे आरोग्यासाठी वेळ नाही. पण कामासोबत फिटनेस या दोन्ही गोष्टी प्राधान्यक्रमात असणे गरजेचे आहे. कामासोबत योगा आणि फिटनेस दोन्ही तत्परतेने व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच, दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीत पीरियड क्रॅम्प्स नसावेत असे अनेक महिलांना वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशी आसने सांगणार आहोत जी पीरियड क्रॅम्प्स आणि पीसीओडीच्या समस्यांपासून आराम देतील. ही आसने भिंतीच्या मदतीने कमी वेळेत आणि सहज करता येतात. (Best wall yoga poses to get relief from period cramps)

जेव्हा आपण योगासने किंवा वर्कआउट करतो तेव्हा त्या दरम्यान फील-गुड हार्मोन एंडोर्फिन हार्मोनचा स्राव होतो. त्यामुळे वेदना कमी होतात. योगाभ्यास किंवा कसरत करताना शरीराची हालचाल होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. यामुळे पीरियड क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते. यामुळे तणाव आणि चिंता देखील कमी होते.

अधिक वाचा: Relationship Tips : पार्टनरसोबत एका दिवसात कितीवेळा ठेवावे शारीरिक संबंध; जाणून घ्या नाहीतर नात्यावर होईल परिणाम

मासिक पाळीच्या दरम्यान रनिंग, स्क्वॅट्स, जंपिंग जॅक इत्यादी सारख्या उच्च तीव्रतेचे व्यायाम करू नयेत. हे रक्त प्रवाह प्रभावित करू शकतात. हे हार्मोन्समध्ये व्यत्यय आणू शकतात. मासिक पाळी दरम्यान काही योगासने ही सामान्य लक्षणे कमी करण्यासाठी एक प्रभावी मार्ग असू शकतात जसे की सूज येणे आणि मूड बदलणे.

ही योगासने 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात करता येतात

 पादोत्तानासन (Padottanasana)

  • चटईवर झोपा.
  • भिंतीच्या साहाय्याने पाय वरच्या बाजूला उचला.
  • या स्थितीत 2-5 मिनिटे राहू शकता.
  • या दरम्यान तुमचे पाय पूर्णपणे सरळ असावेत. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

अधिक वाचा: झोपण्याच्या पद्धतीमुळे तुम्ही असंख्य समस्यांना बळी पडू शकता, तुमच्या झोपण्याची पद्धत कशी?

उपविष्टकोणासन ( Upavistha Konasana)

  • भिंतीच्या साहाय्याने पाय वरच्या बाजूला न्या.
  • पाय सरळ ठेवा.
  • नंतर दोन्ही पायांना हाताने आधार देऊन शक्य तितके पसरवा.
  • या अवस्थेत काही काळ राहता येते.
  • शरीरात लवचिकता आणण्यासोबतच प्रजननक्षमतेतही मदत होते.
  • हे आसन प्रत्येकजण करू शकतो.

सर्वांगासन (Sarvangasana)

  • भिंतीच्या मदतीने पाय वरच्या दिशेने न्या.
  • पाय सरळ ठेवा.
  • आपले पाय भिंतीवर ठेवून, आपले गुडघे थोडेसे वाकवा.
  • कमरेच्या खाली हात ठेवून धड वर करण्याचा प्रयत्न करा.
  • या अवस्थेत थोडा वेळ राहा.
  • थायरॉईड, केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. त्वचा चमकदार होते.

अधिक वाचा:  पाठदुखीला करायचंय Bye-Bye, मग Malaika Arora चा वर्कआउट व्हिडिओ पहाच

बद्धकोणासन (Badhakonasana)

  • भिंतीचा आधार घेऊन गुडघे वाकवून, हळूहळू फुलपाखराची मुद्रा तयार करा.
  • हे आसन सर्वांसाठी सुरक्षित आहे. पीरियड क्रॅम्प्सपासून आराम मिळतो.
  • भावनिक अडथळे, थकवा आणि चिंता कमी होतात.

टिप- या लेखात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ही स्वीकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांता सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी