Gym or Park: जिममध्ये व्यायाम करणं चांगलं की पार्कमध्ये? वाचा आश्चर्यकारक निरीक्षणे

व्यायामासाठी जिमची निवड करावी की पार्कची, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. वास्तविक, दोन्ही व्यायाम उत्तम असून प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

Gym or Park
जिममध्ये व्यायाम करणं चांगलं की पार्कमध्ये?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जिममध्ये व्यायाम करावा की पार्कमध्ये?
  • जिममधील व्यायाम होतो परिणामकारक
  • पार्कमधील व्यायाम असतो आनंददायी

Gym or Park: शरीर निरोगी (Healthy body) आणि आकर्षक ठेवण्यासाठी व्यायामाची (Exercise) प्रत्येकाला गरज असते. व्यायामामुळे केवळ शरीरच नाही, तर मनदेखील ताजंतवानं होतं. व्यायाम कुठं करावा हे प्रत्येकावर अवलंबून असतं. प्रत्येकाकडे असणारा वेळ, पैसा, त्याची शरीरयष्टी, वय, सध्याची शारीरिक अवस्था यासारख्या अनेक गोष्टींवरून एखादी व्यक्ती जिममध्ये (Gym) जाते की पार्कमध्ये (Park) व्यायाम करते, हे ठरत असतं. काहीजणांना जिममध्ये जाऊन घाम गाळायला आवडतं, तर काहीजणांना मोकळ्या हवेत व्यायाम करणं अधिक पसंत असतं. त्यामुळे कुठल्या प्रकारचा व्यायाम अधिक चांगला असतो, याचं उत्तर खरं तर प्रत्येकाच्या निवडीवर अवलंबून असतं. मात्र दोन्ही प्रकारच्या व्यायामांचे वेगवेगळे फायदे असतात. कुठल्या व्यायामाने काय फायदा होतो, ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. 

जिममधील व्यायाम

अनेकजण जिममध्ये जाऊन व्यायाम कऱणं पसंत करतात. जिममध्ये व्यायाम कसा करावा, हे शिकवण्यासाठी स्पेशल ट्रेनर किंवा कोच असतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम केल्यामुळे तो अधिक प्रभावी होतो आणि अपेक्षित परिणाम लवकर दिसण्याची शक्यता वाढते. जिममध्ये पूर्णतः व्यायामासाठी पोषक वातावरण तयार करण्यात आलेलं असतं. आजूबाजूला सर्वजण व्यायाम करत असतात, त्यासाठी अनुकूल संगीतही लावण्यात आलेलं असतं आणि व्यायाम करायला प्रवृत्त करणारे काही फोटोदेखील असतात. या सगळ्या वातावरणाचा परिणाम व्यक्तीवर होऊन अधिक प्रभावीपणे व्यायाम केला जातो. त्यामुळेच कमी वेळेत अधिक परिणामकारकता दिसण्यासाठी जिमची निवड करण्यात येते. 

अधिक वाचा - Eye care tips: या चुकीच्या सवयींमुळे होतं डोळ्यांचं नुकसान, आजच सोडा!

निसर्गाचा आनंद

काहीजणांना मात्र व्यायामाचा परिणाम दिसण्याऐवजी त्याचा आनंद घेण्यात अधिक स्वारस्य असतं. त्यामुळे अशा लोकांसाठी जिमऐवजी पार्कमध्ये व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पार्कमध्ये मोकळी हवा असते. तिथे फिरल्यामुळे किंवा वेगवेगळे खेळ खेळल्यामुळे मन ताजंतवानं होतं आणि दिवसभराचा सगळा थकवा आणि शीण निघून जाण्यास मदत होते. जिमच्या तुलनेत मोकळ्या मैदानात मोकळी हवाही असते. त्यामुळे ट्रेडमिलवर धावण्याऐवजी मोकळ्या हवेत धावणं हे शरीरासाठी अधिक फायद्याचं असल्याचं डॉक्टर सांगतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात पार्कमध्ये व्यायाम केल्यामुळे ड जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात शरीराला मिळतं. त्यामुळे हाडं मजबूत व्हायला मदत होते. शिवाय सध्या अनेक पार्कमध्ये ओपन जिम असतात. या जिम मोफत वापरता येतात. त्यांचा वापर करून मोकळ्या हवेचा आनंद घेत जिमचा व्यायाम केल्याचा फायदाही घेता येऊ शकतो. 

अधिक वाचा - Navratri Fasting: नवरात्रीत करतात 9 दिवसांचा उपवास...पाहा काय असतात आरोग्यासाठी उपवासाचे फायदे

व्यायाम करणं आवश्यक

सध्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकाने व्यायाम करण्याची गरज असल्याचं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. तुम्ही घरी काम करत असा किंवा ऑफिसमध्ये. प्रत्येकाने व्यायामासाठी थोडा वेळ बाजूला काढण्याची गरज असते. जिममध्ये जायचं की पार्कमध्ये व्यायाम करायचा, हे प्रत्येकाने त्याच्या आवडीनुसार ठरवावं, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.

डिस्क्लेमर - व्यायामाबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही शंका असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी