Side effects of holding urine: काहीवेळा जास्त कामामुळे आणि प्रवासादरम्यान सुविधा नसल्यामुळे लघवी बराच वेळ रोखून धरली जाते. आपल्यापैकी अनेकांनी हे कधी ना कधी केले असेलच! पण असे केल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.(Beware! Holding urine for a long time can cause serious problems)
केगेल8 चे संस्थापक आणिआरोग्य तज्ज्ञ स्टेफनी टेलर यांनी सांगितले की, " मूत्राशय भरल्यानंतर लघवी करणे टाळल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त काळ लघवी रोखून ठेवल्याने ओटीपोटाच्या स्नायूवर विपरित परिणाम होतो. बऱ्याच वेळ लघवी रोखून धरल्यास मुत्राशयाच्या स्नायू आवश्यकतेनुसार आकुंचीत होण्याची क्षमता गमावून बसतात. ज्यामुळे मूत्राशय पूर्णतः रिकामे होऊ शकत नाही. ज्यामुळे लघवी करताना त्रास होऊ शकतो. तसेच लघवी बराच वेळ थांबवून ठेवल्यामुळे कोरडेपणाची देखील समस्या उद्भवते.
अधिक वाचा : SBI Recruitment 2023: SBI मध्ये 1031 पदांची बंपर भरती
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) ही महिला आणि पुरुषांमध्ये उद्भवणारी सामान्य समस्या आहे. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. यापैकी एक कारण म्हणजे लघवी रोखून धरणे. वेळेवर लघवी न केल्याने बॅक्टेरियांना वाढण्याची संधी मिळते, जे मूत्राशयाच्या आत देखील पोहोचू शकतात. हा संसर्ग वाढल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत वेळेवर लघवी करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला वारंवार UTI चा त्रास होत असेल तर वेळेवर लघवी करा आणि पुरेसे पातळ पदार्थ खा आणि भरपूर पाणी प्या.
युरीन लिक किंवा लघवी गळतीची समस्या बहुतांश वृद्धापकाळात होऊ शकते. ज्यात ते त्यांच्या लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ही समस्या मुळात तरुण वयात केल्या गेलेल्या चुकांमुळे होऊ शकते. जर तुम्ही लघवी सातत्याने धरून ठेवली असेल तर तुमचा पेल्विक फ्लोअर कमकुवत झालेला असतो आणि त्यामुळे उतरत्या वयात गळतीची समस्या उद्भवते, शिवाय ही समस्या तुमच्या तरुणपणातही उद्भवू शकते. लघवी सतत रोखून धरल्याने मूत्राशय कमकुवत होतो, ज्यामुळे लघवी बाहेर पडते.
लघवीमध्ये यूरिक ऍसिड आणि कॅल्शियम ऑक्सलेट नावाची खनिजे असतात. जर तुम्ही लघवी जास्त वेळ रोखून धरली असेल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास संभवतो.
अधिक वाचा : इंडोनेशियाचा हा तुरुंग 'पृथ्वीवरचा नरक'
दीर्घ काळ सातत्याने लघवी धरून ठेवल्याने मूत्राशयाचे स्नायू ताणले जातात आणि कमकुवत होतात, ज्यामुळे मूत्राशय फुटण्याची गंभीर समस्या उद्भवू शकते.
लघवी थांबवून धरण्याच्या सवयीमुळे किडनीवर ताण पडतो, ज्यामुळे भविष्यात किडनीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय जास्त वेळ लघवी रोखल्याने किडनी आणि मूत्राशयात वेदना होतात. लघवीनंतर, मूत्राशयाचे स्नायू घट्ट होतात, ज्यामुळे पेल्विक क्रॅम्प्सची समस्या उद्भवते.
जर तूमचे मूत्राशय लघवी करताना पूर्णपणे रिकामे होत नसेल, तर तुम्हाला यूरिनरी रिटेंशन ची समस्या असू शकते. यात लघवी करताना वेदना आणि अडचण येऊ शकते.