Bhogi Bhaji Recipe for Makar Sankranti Special : भोगीच्या दिवशी तयार करा आरोग्यदायी भोगीची भाजी,  पाहा भोगीच्या भाजीची हेल्दी रेसिपी

Bhogichi Bhaji Recipe in Marathi: मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातील विविध भागात भोगीची भाजी बनवली जाते. टेस्ट सोबतच आरोग्यासाठी चांगली असलेली ही भाजी तुम्हालाही टेस्ट बरोबर हिवाळ्यात आरोग्यही प्रदान करेल. 

how to make bhogichi bhaji on the eve of makar sankranti read in marathi
भोगीच्या दिवशी तयार करा आरोग्यदायी भोगीची भाजी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • ‘न खाईल भोगी तो राहील सदा रोगी’ अशी म्हण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
 • त्यामुळे भोगीच्या दिवशी स्पेशल भाजी करण्याची पद्धत महाराष्ट्रातील विविध भागात आहे.
 • भोगीच्या भाजीची टेस्ट ही वेगवेगळ्या भागात आपल्या पद्धतीने वेगवेगळी असते.

Makar Sankranti Special Bhogi Bhaji Recipe in Marathi: ‘न खाईल भोगी तो राहील सदा रोगी’ अशी म्हण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे भोगीच्या दिवशी स्पेशल भाजी करण्याची पद्धत महाराष्ट्रातील विविध भागात आहे.  भोगीच्या भाजीची (bhogichi bhaji recipe in marathi) टेस्ट ही वेगवेगळ्या भागात आपल्या पद्धतीने वेगवेगळी असते.  संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी शेतात भोगीची भाजी (bhogi bhaji recipe in marathi)आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा खास बेत ग्रामीण भागात केला जातो. हिवाळ्यात मिळणाऱ्या मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या भाज्या आणि आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या भाज्यांचा यात वापर केला जातो. घेवडा, हरभरा, बोरं, तुरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा या खास भाज्या हिवाळ्यात आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरे आणि खसखस असे गरम पदार्थांचा समावेश केल्यास  हिवाळ्यासाठी उर्जा मिळण्याचे काम होते. 

अधिक वाचा : ​Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीचे महत्त्व, इतिहास, सण साजरा करण्याची पद्धत

साहित्य: (bhogi bhaji ingredients)
 

 1. 1 चिरलेला बटाटा, 
 2. 1 मध्यम आकाराचं चिरलेलं वांगे, 
 3. 1 चिरलेलं गाजर, 
 4. अर्धी वाटी ताजे मटार, 
 5. अर्धी वाटी ओले हिरवे हरभरे, 
 6. 1 मोठा चमचा भिजवलेले शेंगदाणे, 
 7. 1 मोठी शेवगाची शेंग (लांब काप केलेली). 
 8. 2 चमचे तिळकूट, 
 9. 2 चमचे चिंचेला कोळ, 
 10. 1 मोठा गूळ, 
 11. मोठा चमचा ओलं खोबरं, 
 12. चवीपुरते मीठ, 
 13. फोडणीचं साहित्य 

अधिक वाचा : मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी WhatsApp, SMS द्वारा अशी पाठवा 'निमंत्रण पत्रिका'

कृती: (Bhogi Special Dish)

 1. पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, 
 2. जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, 
 3. आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. 
 4. यात शेंगदाणे, ताजे मटार, हिरवे हरभरे, बटाटा, शेवग्याच्या शेंगा आणि मीठ घालून वाफा काढाव्या. नंतर वांगं आणि गाजर घालून जरा पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. 
 5. भाज्या शिजत आल्यावर चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा. 
 6. शिजल्यावर गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. 
 7. भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.

अधिक वाचा :  Makar Sankranti : यंदा कधी आहे भोगी, मकरसंक्रांती आणि किंक्रांत?

मधुराज रेसीपीमध्ये पाहा भोगीची भाजी 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी