दररोज एक वाटी चणे खाल्ल्यास महिला होतील आणखी सुंदर, पुरुषांमध्ये येईल घोड्यासारखी ताकद

bhuna chana health benefits, roasted chana health benefits, boost mens sexual power, boost body capacity to get ride physical weakness : दररोज मर्यादीत प्रमाणात भाजलेले चणे खाणे आरोग्याला फायद्याचे आहे.

bhuna chana health benefits, roasted chana health benefits, boost mens sexual power, boost body capacity to get ride physical weakness
भाजलेले चणे आरोग्यासाठी फायद्याचे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • भाजलेले चणे आरोग्यासाठी फायद्याचे
 • दररोज एक वाटी चणे खाल्ल्यास महिला होतील आणखी सुंदर
 • दररोज एक वाटी चणे खाल्ल्यास पुरुषांमध्ये येईल घोड्यासारखी ताकद

bhuna chana health benefits, roasted chana health benefits, boost mens sexual power, boost body capacity to get ride physical weakness : शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी फक्त व्यायाम करून चालत नाही तर योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती यांचीही गरज आहे. योग्य आहार म्हणजे ताजी फळे, ताज्या हिरव्या भाज्या यांच्यासोबतच प्रथिने, खनिजे आदी पोषक घटक शरीराला पुरविणारे पदार्थ खाणे आश्यक आहे. 

दररोज मर्यादीत प्रमाणात भाजलेले चणे खाणे आरोग्याला फायद्याचे आहे. चण्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. तसेच भाजलेले चणे खाल्ल्यावर शरीराला इतर अनेक फायदे होतात. हे फायदे जाणून घ्या...

 1. मेंदू : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे मेंदूची आकलन क्षमता आणि विचार करण्याची क्षमता वाढते. 
 2. पोट : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होण्यास मदत होते. पचनक्षमता सुधारते.
 3. हाडे : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे हाडांना कॅल्शियम मिळते. हाडे आणखी मजबूत होतात. 
 4. रोगप्रतिकारक क्षमता : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
 5. मधुमेह नियंत्रणात राहतो : भाजलेले चणे खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 6. गरोदर महिला : गरोदर असताना अनेकदा महिलांना उलट्या होतात. उलट्यांची संख्या वाढल्यास महिलांना आणि त्यांच्या गर्भातील बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका गरोदर महिलेने मर्यादीत प्रमाणात वैद्यकीय सल्ल्याने भाजलेले चणे खाल्ल्यास टळू शकतो.
 7. अॅनिमिया : शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले तसेच शरीरातील आयर्न आणि हिमोग्लोबिन कमी झाले की संबंधित व्यक्ती अॅनिमिक होते. अशा अॅनिमिक व्यक्तींनी भाजलेले चणे खावे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील आयर्नचे (लोह) प्रमाण वाढण्यास मदत होते.
 8. वजन : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी मर्यादीत प्रमाणात वैद्यकीय सल्ल्याने भाजलेले चणे खावे. फायदा होतो. 
 9. स्नॅक्स अर्थात न्याहरी म्हणून खाऊ शकता भाजलेले चणे : भाजलेले चणे स्नॅक्स अर्थात न्याहरी म्हणून खाऊ शकता. यामुळे पोट लवकर भरते आणि चण्यांमध्ये मर्यादीत कॅलरी असल्यामुळे वजन वाढण्याचा त्रास कमी होतो. 
 10. भाजलेल्या चण्यांमधील पोषक घटक : भाजलेल्या चण्यांमध्ये कर्बोदके, प्रथिने, तंतूमय पदार्थ, लोह, कॅल्शियम आणि वेगवेगळी व्हिटॅमिन्स आहेत. चण्यांतील हे पोषक घटक आरोग्यासाठी लाभदायी आहेत.
 11. पुरुष आणि महिला : नियमित मर्यादीत प्रमाणात भाजलेले चणे खाणाऱ्या महिलांची त्वचा तजेलदार होण्यास मदत होते; यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते. तसेच पुरुषांच्या शरीरात घोड्यासारखी ताकद येते. पुरुषांचा थकवा दूर होतो आणि त्यांचा स्टॅमिना वाढतो.

डिस्क्लेमर / Disclaimer : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी