Health Tips: कडक उन्हामुळे तुमच्याही पायांवर पडलेत काळे डाग? या घरगुती उपायांनी मिळवा डागांपासून सुटका 

तब्येत पाणी
Updated May 06, 2022 | 16:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Feet Tanning Home Remedies । उन्हाळ्याच्या कडक उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याची खूप काळजी घेतली जाते. पण आपल्या चपलांच्या अथवा शुजच्या योग्य डिझाइनच्या टॅनिंगच्या खुणा पायावर राहिल्यावर त्याबाबतीत निष्काळजीपणा आडवा आला का असे वाटते.

Black spots on your feet due to hot sun, Get rid of blemishes with these home remedies
कडक उन्हामुळे तुमच्या पायांवर पडलेत काळे डाग?, वाचा सविस्तर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उन्हाळ्याच्या कडक उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याची खूप काळजी घेतली जाते.
  • मात्र पायांच्या बाबतीत आपण निष्काळजीपणा करतोय की काय असा आभास होतो.
  • कोणत्याही घटकाचा रंग सुधारण्यासाठीही हळद गुणकारी आहे.

Feet Tanning Home Remedies । मुंबई : उन्हाळ्याच्या कडक उन्हात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याची खूप काळजी घेतली जाते. पण आपल्या चपलांच्या अथवा शुजच्या योग्य डिझाइनच्या टॅनिंगच्या खुणा पायावर राहिल्यावर त्याबाबतीत निष्काळजीपणा आडवा आला का असे वाटते. या खुणा इतक्या डार्क असतात की त्या सहजासहजी काढता देखील येत नाहीत. या खुणांच्या डागांपासून मुक्त होण्यासाठी रोज रात्री पायांवर अँटी टॅनिंग क्रीम किंवा इतर कोणतेही मलम लावावे लागते पण तरीदेखील टॅनिंग कमी होत नाही. या टॅनिंगच्या खुणा तुमच्या पायावरही दिसत असतील तर काही घरगुती उपाय करून पाहा. पायांवरील खुणांचे डाग लगेच दूर होतील. (Black spots on your feet due to hot sun, Get rid of blemishes with these home remedies). 

अधिक वाचा : लग्नाआधी महिला पोलिसाने होणाऱ्या पतीलाच घातल्या बेड्या

पायांवरील खुणांचे डाग हटवण्याचे घरगुती उपाय (Home Remedies For Feet Tanning)

१) कोरफड - कोरफडीच्या साहाय्याने केलेल्या जेलमध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका. याने पायाला चांगले मसाज करा. ही क्रिया किमान २० मिनिटे तशीच राहू द्या आणि नंतर धुवा. जर वेळ असेल तर दिवसातून दोनदा असे करा. 

२) संत्री - संत्र्यामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्याचा रस पायाला लावा किंवा त्याच्या सालीची पावडर दह्यामध्ये मिसळून पायाला लावा. त्याचा रस सुकल्यानंतर किंवा कोरडा झाल्यानंतर धुवून टाका. 

३) हळद - कोणत्याही घटकाचा रंग सुधारण्यासाठीही हळद (Turmeric) गुणकारी आहे. कच्च्या दुधात (Raw Milk) हळद मिसळून पायाला मसाज करा. टॅनिंग कमी करण्यासाठी कच्चे दूध देखील प्रभावी आहे. हळद काही वेळ तशीच राहू द्या आणि नंतर धुवा.

४) लिंबू - लिंबू अर्धा कापून घ्या. आता या कापलेल्या लिंबूने पाय स्वच्छ साफ करा. जेव्हा पाय लिंबाचा रस शोषून घेणे थांबवतील तेव्हा थोडा वेळ थांबा. पाय कोरडे झाल्यावर काही वेळ मसाज करा. पायावर रस चांगला कोरडा होऊ द्या. त्यानंतरच धुवा. यामुळे टॅनिंग फिकट होईल.

५) ब्रेड - ब्रेडपासून बनवलेल्या स्क्रबमुळे टॅनिंगचे डागही कमी होतात. ब्रेड दह्यात भिजत ठेवा. काही वेळाने ब्रेड मऊ होईल. नंतर पायाला लावा. नंतप पाय सुकायला लागल्यावर कोमट पाण्याने धुवा.

६) तांदूळ - तांदूळ बारीक करा. पेस्ट गुळगुळीत नसेल तर दही घालून बारीक करा. या पेस्टमध्ये हळद आणि लिंबाचे काही थेंब घाला. ही पेस्ट पायांना लावा आणि वाळल्यानंतर धुवा.

७) बटाटा - बटाट्याचा रस देखील एक चांगला ब्लीचिंग एजंट आहे. बटाटा अर्धा कापून घ्या. त्यावर काही कट तयार करा. आता बटाट्याने पायाला मसाज करा. शेवटी काही वेळाने स्वच्छ धुवा. 

८) बेसन - बेसनामध्ये दही, हळद आणि लिंबाचे काही थेंब मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट थोडी पातळ ठेवा. पायाला लावा. कोरडे झाल्यावर पायांना मसाज करून धुवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी