Black Tea Health Benefits: वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर Black Tea, जाणून घ्या सविस्तर फायदे

Black Tea For Health: ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट देखील असतात. ज्यात सोडियम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सनं समृद्ध असते. हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी देखील चांगले आहे.

Black Tea
काळ्या चहाचे (ब्लॅक टी) फायदे  
थोडं पण कामाचं
  • चहा आणि कॉफी (Tea and coffee) हे दोन पेय लोकांची आवडती (Favorite Drinks) असतात.
  • चहा पिणं हे आरोग्यासाठी उत्तम आहे. त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.
  • ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट देखील असतात.

नवी दिल्ली:  Black Tea Good For Health: चहा आणि कॉफी (Tea and coffee)  हे दोन पेय लोकांची आवडती (Favorite Drinks) असतात. त्यात चहा प्रेमी खूप असतात. चहाचा अर्थ काय आहे हे फक्त चहाप्रेमींनाच माहित आहे. चहा चवीला (Drinking tea) चविष्ट, रूचकर लागते त्यामुळे ती बऱ्याच लोकांना आवडते. चहा पिणं हे आरोग्यासाठी उत्तम आहे. त्याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. त्यात जर काळा चहा म्हणजेच Black Tea  बद्दल बोलायचे झाल्यास ही चहा दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ब्लॅक टीमध्ये पॉलीफेनॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट देखील असतात. ज्यात सोडियम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सनं समृद्ध असते. हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी देखील चांगले आहे. 
 
काही लोकांना या काळ्या चहामध्ये लिंबाचा रस (Lemon Juice)पिळून त्यात मध टाकून थंड प्यायला आवडते. चला तर आज जाणून घेऊया काळ्या चहाचे म्हणजेच ब्लॅक टीचे आरोग्यदायी  (Health)फायदे.

अधिक वाचा-  समंथानं खरेदी केलं कोट्यवधींचं घर, EX पती नागा चैतन्य आणि घराचं आहे खास कनेक्शन

काळ्या चहाचे (ब्लॅक टी) फायदे (Black Tea Health Benefits) 

डायबिटीज

दिवसातून 2 ते 3 कप ब्लॅक टी प्यायल्याने डायबिटीजचा (Diabetes)धोका 42 टक्क्यांनी कमी होतो. ही चहा साखर न घालता देखील बनावता येते किंवा मध घालून ही पिता येऊ शकते.

पचनास मदत करते

ब्लॅक टी चा पचनक्रियेवर (Digestion)आरामदायी प्रभाव पडतो. हे आतड्यातील चांगल्या बॅक्टरियांना प्रोमोट करते आणि हानिकारक  बॅक्टरिया काढून टाकण्यास मदत करते. पोटाच्या जंतुसंसर्गासाठी ही चहा चांगली असल्याचं मानलं जातं.

तणाव कमी करते 

काळ्या चहामुळे तणाव कमी होण्यासही मदत होते. यामुळे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स स्थिर होतात आणि आराम मिळतो. तुम्ही ते तणावमुक्त पेय म्हणून देखील पिऊ शकता.

वजन कमी होण्यास मदत 

जास्त वजन हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या घेऊन येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत वजन कमी  (Weight Loss) करण्यासाठी ब्लॅक टी प्यायल्यास ही समस्या दूर होते. परफेक्ट शेममध्ये येण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी एक कप गरम ब्लॅक टी पिऊ शकता.

अधिक वाचा-  रात्रीचे केस कापले तर काय होतं?, जाणून घ्या त्यामागचं कारण

कमी बॅक्टेरिया

बॅक्टेरिया चांगले आणि वाईट दोन्ही असतात. मात्र त्यातले बहुतेक वाईट असतात. ब्लॅक टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म या संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया काढून टाकण्यात प्रभाव दाखवतात.


(अस्वीकरण: ही सामग्री, सल्ल्यासह, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.  टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी