Superfit Dadai @ 53 | जगभरात आपल्या फिटनेससाठी (Fitness) ओळखले जाणारे अनेक आयकॉन्स आहेत. अर्नाल्ड श्र्वाजनेगर, रॉनी कोलमेन यासारख्या बॉडी बिल्डर्सकडून (Body Builder) प्रेरणा घेऊन जगात अनेकांनी व्यायामाला सुरुवात केली. जगातील अनेक देशांतल्या वेगवेगळ्या जिममध्ये यासारख्या बॉडी बिल्डर्सचे फोटोही लावलेले दिसतात. या फोटोंमधून प्रेरणा घेऊन अनेक तरुण स्वतःच्या शरीराची मशागत करत असतात. त्यातील अनेकजण यात यशस्वी होतात आणि बॉडीबिल्डिंग हे त्यांचं पूर्ण वेळ करिअरही होतं. सध्या जगभर चर्चा आहे ती अशाच एका बॉडी बिल्डर महिलेची. वयाच्या 53 व्या वर्षी तिने अशी काही शरीरयष्टी बनवली आहे की तिच्याकडे पाहून कुणालाही ती पन्नाशीत असल्याचं वाटत नाही. ती प्रोफेशनल बॉडी बिल्डर आहे आणि प्रचंड मेहनत करून तिने हा टप्पा गाठला आहे. जाणून घेऊया, कोण आहे ही महिला आणि तिनं यासाठी नेमकं काय केलं?
पन्नाशीतही कमालीच्या फिट असणाऱ्या या महिलेचं नाव आहे अँड्रिया सनशाईन. ( Andria Sunshine) ती लंडनमध्ये राहते. ती ब्राझील आणि डच मॉडेल असून प्रोफेशनल बॉडीबिल्डर आहे. सुपरफिट दादी या नावाने अँड्रिया लोकप्रिय आहे. पुरुषांना प्रचंड फिट असलेल्या महिलांवर क्रश असतो, असा तिचा अनुभव आहे. माझा फिटनेस चांगला असल्यामुळे अनेकजण मला बाहेर डेटवर येण्यासाठी विचारतात, असं ती म्हणते. साधारण पंचवीस ते पस्तीस वयातले अनेक पुरुष तिच्यावर लट्टू असतात. अर्थात, फिटनेस ही तिची पॅशन आहे.
NYPost नं दिलेल्या माहितीनुसार एकेकाळी अँड्रिया दररोज 8 तास व्यायाम करत असे. प्रचंड मेहनतीनं तिनं सध्याचं शरीर कमावलं आहे. आता मात्र ती रोज 3 तास व्यायाम करते. एक तास कार्डिओ, मग एक तास वेट ट्रेनिंग आणि नंतर स्ट्रेचिंग असं तिचं शेड्यूल असतं. जिममध्ये गेल्यावर तिचा फोकस फक्त आणि फक्त व्यायामावर असतो.
तिनं अनेक बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे, जिथं तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या महिला सहभागी होत्या.
अँड्रिया तिच्या रोजच्या जेवणात ब्रोकली आणि हिरव्या भाज्या खाते. याशिवाय प्रोटीन असणारे अनेक पदार्थ तिच्या आहारात असतात. कधी कधी ती 3500 कॅलरीजचंही सेवन करते. स्वतःला हेल्दी आणि प्रमाणबद्ध राखण्यासाठी ती गोड भाज्यांपासून लांबच राहते. ती जेवण्यात तेल आणि मीठ यांचा वापर करतच नाही.
आतापर्यंत आपण एकदाही स्मोकिंग केलं नसून इतरांनाही स्मोकिंगपासून दूर राहण्याचा सल्ला देत असल्याचं अँड्रिया सांगते. जर मी स्मोकिंग करत असते तर आता जशी आहे तशी राहिले नसते, असं तिचं म्हणणं आहे. तरुण असताना मी एकदा स्मोकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेवढाच काय तो प्रयत्न. तारुण्यसुलभ मजामस्ती करतानाची केवळ एक मजा. पण तो अपवाद वगळला, तर आपण व्यसनांपासून कायमच दूर असल्याचं ती म्हणते. मला कुठल्याही प्रकारचे ड्रेस सूट होतात आणि शरीर सुडौल असल्यामुळे मी त्यात सुंदरच दिसते, असं ती सांगते.