फिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट

Akshay kumar diet plan अक्षयच्या फिटनेसचे एक कारण त्याचे डाएट आहे. शेफ मोहित सावरगांवकर यांनी अक्षय कुमारच्या डाएटची माहिती दिली.

Akshay kumar diet plan
फिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट 

थोडं पण कामाचं

  • फिटनेससाठी अक्षय कुमार करतो 'हे' डाएट
  • अक्षय कुमारचा ब्रेकफास्ट
  • अक्षय कुमारचे दुपारचे जेवण

मुंबईः अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) ५३ वर्षांचा आहे. वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी अक्षय फिटनेस (fitness) जपण्यात यशस्वी झाला आहे. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, देशभक्ती अशा वेगवेगळ्या विषयांवरील अनेक हिट चित्रपट देणारा अक्षय बॉलिवूडच्या (bollywood) महागड्या कलाकारांपैकी (costly actor in india) एक आहे. लोकप्रिय कलाकार असूनही त्याच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेल्याचे दिसत नाही. तो रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बॉलिवूडच्या पार्ट्या तसेच धुम्रपान (smoking), मद्यपान (alcohol/drinking) अशा जीवाला घातक असलेल्या सर्व व्यसनांपासून (vices/Addiction) चार हात लांब आहे. फिटनेस फ्रिक अक्षय मार्शल आर्ट्स, अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, नॅचरल थेरपी आणि वैयक्तिक शिस्तीमुळे आजही स्पोर्टी (sporty) दिसतो. अक्षयच्या फिटनेसचे एक कारण त्याचे डाएट आहे. शेफ मोहित सावरगांवकर यांनी अक्षय कुमारच्या डाएटची माहिती दिली. हे डाएट करत असल्यामुळे पन्नाशी ओलांडूनही अक्षय 'फिट अँड फाइन' असल्याचे शेफ मोहित सावरगांवकर यांनी सांगितले. (Akshay kumar diet plan)

अक्षय कुमारचा ब्रेकफास्ट (Breakfast)

दररोज पहाटे ४.३० वाजता उठणारा अक्षय रात्री ९ वाजता झोपतो. शूटिंगचे अपवाद वगळले तर तो झोपेची वेळ कायम पाळतो. रात्रपाळीत काम करणे टाळतो. स्टॅमिना वाढवण्यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा बास्केटबॉल खेळणे आणि अधूनमधून मुलासोबत स्विमिंगचा आनंद घेण्यावर तो भर देतो. दररोज सकाळी चिया पुडिंग (Chia Pudding), विविध प्रकारच्या बेरीज (Berries) आणि अॅवोकॅडो (Avocado) खाणे तो पसंत करतो. ताजी फळे आणि सुकामेवा खाणे त्याला आवडते.

अक्षय कुमारचे दुपारचे जेवण (Lunch)

अक्षय दुपारच्या वेळी शाकाहारी जेवण पसंत करतो. तो जेवणात भात आणि पम्पकिन थाय टोफू करी (Pumpkin Thai Tofu Curry) खाणे पसंत करतो. दुपारी चौरस आहार घेण्यावर अक्षय भर देतो. शूटिंगसाठी बाहेर असेल तर अक्षयला घरुन जेवणाचा डबा येतो. मुंबई बाहेर असल्यास अक्षय शक्य तिथे शेफला सूचना देऊन कमी तेलात तळलेले मोजकेच पदार्थ खाणे तो पसंत करतो. पंजाबी असला तरी अक्षय राजमासारखे वातूळ पदार्थ खाणे टाळतो. जेवणात हिरव्या भाज्या, डाळींचे वरण किंवा आमटी, पराठा किंवा भाकरी खाण्याला तो प्राधान्य देतो. तब्येतीला जे झेपते ते खावे या मताचा असलेला अक्षय  जास्त तेलकट, तुपकट पदार्थ तसेच फास्ट फूड आणि जंक फूड (अरबटचरबट) टाळतो. जेवताना निवांतपणे जास्तीत जास्त वेळा चावून खाण्यावर तो भर देतो. जेवताना तो बाकीच्या चिंता, कामाचे व्याप, सर्व प्रकारची गॅजेट दूर ठेवतो.

अक्षयला आवडतात बदाम आणि ब्ल्यूबेरी

अक्षय कुमारला बदाम (Almond) आणि ब्ल्यूबेरी (Blueberry) खाणे आवडते. चहा, कॉफी, सिगरेट, दारू, पान, तंबाखू, गुटखा, मावा, अंमली पदार्थ यापासून तो लांब राहतो. दिवसभरात भरपूर पाणी पिण्यावर तो भर देतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण ठरलेल्या वेळेत घेण्याला तो प्राधान्य देतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी