डेंग्यूपासून वाचण्यासाठी शबाना आझमींनी दिल्या खास टिप्स, १० मिनिटं 'हे' काम नक्की करा! 

Shabana Azami tips dengue protection: डेंग्यूमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. ज्यामुळे आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एक नवं अभियान सुरु केलं आहे. ज्याला शबाना आझमींनी पाठिंबा दिला आहे. 

Shabana-Azami
डेंग्यूपासून वाचण्यासाठी शबाना आझमींनी दिल्या खास टिप्स  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डेंग्यूविरुद्ध अभियान सुरु केलंय
  • शबाना आझमी देखील डेंग्यूविरुद्ध लढण्यासाठी दिल्या खास टिप्स
  • १० आठवडे, १० वाजता फक्त १० मिनिटं करा 'हे' काम

मुंबई: पावसाळा सुरु होताच डेंगूची लागण देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलं आहे. दिल्ली आणि मुंबईत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात डेंगूचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी डेंगूविरुद्ध लढण्यासाठी एक विशेष अभियान सुरु केलं आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी या देखील या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. तसंच त्यांनी यावेळी डेंग्यूपासून वाचण्यासाठी काही टिप्स देखील दिल्या आहेत. 

शबाना आझमी यांनी ट्वीट करुन असं म्हटलं आहे की, 'मी त्यावेळी हैराण झाले जेव्हा डेंग्यूच्या तपासणीसाठी बीएमसी अधिकारी माझ्या घरी आले. त्यावेळी त्यांनी मला असंही सांगितलं की, लोकं आम्हाला त्यांच्या घरात देखील घुसून देत नाहीत.' 

शबाना आझमी यांनी डेंग्यूपासून सावध राहताना टिप्स दिल्या की, 'झाडाच्या कुंड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे मच्छर अंडी देतात. त्यामुळे दररोज न विसरता तेथील पाणी बदलून टाका. तसंच आपल्या घराजवळ किंवा घरात कुठे पाणी तर जमा होत नाही ना याची काळजी घ्या.' 

यावेळी शबाना आझमी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या डेंग्यू विरुद्ध अभियानाला पाठिंबा देत असं म्हटलं की, 'मी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देते. आपण सर्वांनी जर प्रत्येक रविवारी सकाळी १० मिनिटं आपल्या घराचं परिक्षण केलं तर आपण डेंग्यूशी लढू शकतो.' 

मान्सूनमध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता यासह देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू वाढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये एका १३ वर्षीय मुलाचा डेंग्यूमळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, पावसाळ्यात योग्य ती काळजी घेतल्यास आपण डेंग्यूला हद्दपार करु शकतो. 

दुसरीकडे कोलकातामध्ये एका २४ वर्षीय तरुणीने डेंग्यूमुळे आपले प्राण गमावले. दुसरीकडे अशी भीती व्यक्त केली जात आहे की, तेलंगणामध्ये तब्बल ५० जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. तर देहरादूनमध्ये आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एका १८ वर्षीय तरुणीचा देखील समावेश आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...