Weight Loss Nutrition : नवी दिल्ली : हिवाळ्यात (Winter) आपल्या आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्यावी लागते. हा ऋतू थंडीसह अनेक व्हायरल आजारदेखील आणत असतो. हिवाळ्यात आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पौष्टीक (Nutritious Diet) आहार घेणं आवश्यक असतं. जर तुम्ही वजन (Weight) वाढीच्या चिंतेने ग्रासलेले असाल तर हिवाळ्यात इतर वस्तू करण्याऐवजी तुम्ही फक्त पाच प्रकारच्या भाकरींचा (Bread) समावेश तुमच्या आहारात केला तर तुमची वजनाची समस्या सहज सुटेल. आज आपण या लेखात याच पाच भाकरींविषयी जाणून घेणार आहोत..
बाजरीच्या पिठाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे फायदेशीर आहे. बाजरीच्या पिठामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण अधिक असते. स्नायूंना निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी हे खूप चांगले मानले जाते. ज्या लोकांना खूप थंडी जाणवते, सांधे किंवा पाठदुखीची समस्या आहे, दम्याचा त्रास आहे, त्यांनी हिवाळ्यात बाजरीच्या पिठाची भाकर आहारात घ्यावी.बाजरीच्या पिठामध्ये फायबर भरपूर असल्याने ते पचायलाही सोपे असते. यामुळे आपले वजन कमी होण्यासही मदत होते.
नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, लोह, फायबर भरपूर प्रमाणात असल्याने नाचणीचे पीठ आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. डोंगराळ भागात अनेक लोक थंडीचा परिणाम टाळण्यासाठी या पिठापासून बनवलेल्या भाकरी खातात. हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
ज्वारीच्या पिठात प्रथिने, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शरीराला ऊब देण्याचे काम ज्वारी करते. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. तसेच ज्वारीच्या भाकरीमुळे वजनही कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात मक्याच्या पिठाच्या भाकरीचाही खूप फायदा होतो. मक्याच्या पिठात फायबर, जीवनसत्त्वे ए, बी, ई, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. तसेच ते ग्लूटेन फ्री आहे. भाकरी, पराठे, पुरी इत्यादी मक्याच्या पिठापासून आपण तयार करू शकतो. कुट्टूचे पीठ आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रथिने, चरबी, कार्ब्स, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी 2, रिबोफ्लेविन आणि नियासिन यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे.