वर्कआऊटच्या आधी अथवा नंतर जरूर करा नाश्ता

तब्येत पाणी
Updated Jul 28, 2019 | 09:04 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

वेट लॉस प्रोगामचा सगळ्यात मोठा टास्क म्हणजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही. असंच कन्फ्यूजन एक्सरसाईजबाबतही अशते. कोणती एक्सरसाईज ब्रेकफास्टच्या आधी केली जाते आणि कोणती नंतर.

breakfast
ब्रेकफास्ट 

थोडं पण कामाचं

  • वर्कआऊट करण्याआधी जरूर करा ब्रेकफास्ट
  • हार्डकोर एक्सरसाईज करणार असाल नाश्ता गरजेचा
  • एक्सरसाईज आणि ब्रेकफास्ट यांच्यात कमीत कमी एक तासाचे अंतर महत्त्वाचे

मुंबई: वेट लॉससाठी सगळ्यात कठीण गोष्ट असते ती म्हणजे आपण जो व्यायाम करत आहोत त्याचा खरंच फायदा होत आहे का? यासोबतच ज्या व्यायामासाठी आपण तासानतास जिममध्ये घालवत आहोत तो व्यायाम रिकाम्या पोटी केला पाहिजे की ब्रेकफास्टनंतर. आता ब्रेकफास्टनंतर करायचा असल्यास तो किती करायला हवा हे ही ठरवायला हवे. हे खरे आहे की काही व्यायाम हे रिकाम्या पोटी केले पाहिजेत. तर काही व्यायाम हे खाल्ल्यानंतर. कोणतेही वर्कआऊट करण्याआधी त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक असते. तुमचा वेट लॉस प्रोग्राम तुम्हाला कितपत हेल्प करतो हे ही जाणून घेणे महत्त्वाचे असते. यासाठी तुम्हाला जर काही याबाबतचे कन्फ्यूजन असेल तर ते लगेचच दूर करा. 

रिकाम्या पोटी एक्सरसाईज करण्याचे फायदे

तज्ञांच्या मते काही खाल्ल्यानंतर एक्सरसाईज केल्यास त्याचे तितके फायदे होत नाही जितके फायदे रिकाम्या पोटी केल्यानंतर होतात. कारण रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीरातील चरबी खर्च होते. तुम्ही जर व्यायाम खूप कष्टाचा करत असाल तर तो कधीही रिकाम्या पोटी करू नये. एक्सरसाईज करताना शरीरात एनर्जी असणे महत्त्वाचे असते. स्वत:ला एनर्जेटिक ठेवण्यासाठी तुम्हाला हल्का ब्रेकफास्ट करणे गरजेचे असते. 

कोणता व्यायाम रिकाम्या पोटी केला पाहिजे

जर तुम्ही ब्रिस्क वॉकिंग अथवा जॉगिंग करत आहात तर हा व्यायाम रिकाम्या पोटी केला पाहिजे. योगा, प्राणायाम यासारख्या व्यायामांसाठी पोट नेहमी रिकामे असले पाहिजे. इतकंच नव्हे तर तुम्हाला जर पाणी प्यायचे असेल तर ते कमीत अर्धात तास आधी पाणी प्यायले पाहिजे. त्यासोबत एक्सरसाईजनंतर लगेचच पाणी पिऊ नका. जर तुम्ही हार्डकोर एक्सरसाईज करत असाल जसे पुशअप, ट्रेडमिल रनिंग, स्किपिंग, फास्ट झुम्बा तर हे व्यायाम रिकाम्या पोटी करू नका. वर्कआऊट करण्याच्या एक तास आधी हल्का ब्रेकफास्ट करा. यामुळे तुमचा वर्कआऊट स्टॅमिना वाढेल. वर्कआऊट करण्याआधी तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटयुक्त खाणे जसे ओट्स अथवा मुसली, ब्रेडसोबत ऑम्लेट, अंडे, दही, ड्राय फ्रुट्स अथवा पनीर भुर्जीसोबत चपाती हे खावे. नेहमी एक्सरसाईज आणि ब्रेकफास्ट यांच्यात कमीत कमी एक तासाचे अंतर असावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी