Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये घ्या हा नाश्ता 

तब्येत पाणी
Updated Jun 28, 2019 | 20:23 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Weight Loss Tips: एका उकडलेल्या अंड्यात ७८ कॅलेरीज आणि बऱ्याच प्रकारचे महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात. त्यासोबतच अंड्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन सुद्धा कमी करता येते. 

Weight loss tips
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये घ्या हा नाश्ता   |  फोटो सौजन्य: Thinkstock

आपलं आहार आणि लठ्ठपणा याचा खोल संबंध आहे. तुम्ही काय खाता? काय पिता? त्याचा तुमच्या शरीरावर काय प्रभाव होता आणि त्यानं तुमचं वजन कसं वाढतं? असे प्रश्न उद्भवतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय खावं, ज्यामुळे वजन कमी होईल.  हा सध्याच्या दिवसातला एक मोठा प्रश्न आहे. जो जास्तकरून लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या लोकांच्या डोक्यात असतो. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगायला जात आहोत. ज्या ब्रेकफास्टमध्ये समाविष्ट केल्यास वजन कमी करू शकता. 

ब्रेकफास्टमध्ये अंडी खाल्ल्यानं वजन कसं कमी होतं? 

उकडलेल्या एका मोठ्या अंड्यात ७८ कॅलेरीज आणि काही प्रकारचे महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात. यात ल्युटिन आणि जेक्सांथिन असतात. जे एन्टीऑक्सिडेंट आहेत. यामुळे तुमच्या डोळ्यांची नजर चांगली राहते. अंड्यात व्हिटामिन डी देखील असते. ज्यामुळे हाडं आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती व्यवस्थित राहते. यात कोलाइन देखील असतं. जे तुमच्या शरीरातील मेटाबोलिज्म वाढवतं. अंड्यात जवळपास ६ ग्रॅम प्रोटीन असतं. 

breakfast for weight loss

काही संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, ब्रेकफास्टमध्ये अधिक प्रोटीन असलेलं ब्रेकफास्ट केल्यानं भूक कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला पोट भरलं आहे असा समज होतो. एका सर्व्हेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अधिक प्रोटीन असलेला नाश्ता केल्यानं तुम्हाला दिवसभर कमी भूक लागल्याचं वाटतं. त्यामुळे तुम्ही कमी खाणं खाता आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होईल. २०१२ मध्ये ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधानुसार, डाइट्री प्रोटीननी वजन कमी करणं आणि मेटाबोलिकची समस्या व्यवस्थित करण्यासाठी मदत मिळते. कारण हे तुम्हांला भूक लागली असल्याचा जास्त वाटून देत नाही. 

केळं खाऊन करा Fat loss 

केळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. मात्र कॅलेरीजची संख्या कमी प्रमाणात असते. सकाळी ब्रेकफास्टमध्ये गोड सेरेल्सच्या जागी केळं खाणं हा एक चांगला पर्याय आहे. एका छोट्या केळ्यात १०० हून जास्त कॅलेरीज असतात आणि ३ ग्रॅम डाइट्री फायबर असतात. जो तुमच्या दिवसभरातली फायबरची आवश्यकततेच्या १२ टक्के असते. फायबर तुमचं पोटं हळुहळू रिकामी होऊ देत. ज्यामुळे तुम्हाला भूक लागल्याचा साक्षात्कार कमी होतो. हे जेवणानंतर बऱ्याच वेळासाठी तुम्हाला काही आणखी खाण्याचं मन होतं नाही. काही संशोधनात या बाबत स्पष्टता करण्यात आली आहे की, फळं आणि भाज्यांमधून मिळणारे फायबर वजन कमी करण्यासाठी मदत करतात. 

याव्यतिरिक्त कच्च केळं प्रतिरोधक स्टार्चचा एक चांगलं स्त्रोत आहे. प्रतिरोधी स्टार्च असा स्टार्च आहे, ज्यामुळे तुमचं पोट आणि लहान आतडे सहज पचवू शकत नाही. संशोधनात म्हटलं आहे की, प्रतिरोधी स्टार्च तुमचं खाणं आणि पोटाची चरबी कमी करू शकते. 

दही (योगर्ट) 

फॅट लॉस ब्रेकफास्टमध्ये दही एकदम चांगला पर्याय आहे. जर याच्यातील पोषक तत्त्व पाहिल्यास १०० ग्रॅम दह्यात जवळपास ३.५ ग्रॅम आणि २५० ग्रॅममध्ये ८.५ ग्रॅम प्रोटीन असतं. यात केसीन किंवा प्रोटीन होऊ शकते. हे त्यातल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. पाण्यात मिसळणाऱ्या प्रोटीनला वेह (Weah) आणि न मिसळणाऱ्या दुधाच्या प्रोटीनला केसीन (Casein) म्हटलं जातं. केसीन प्रोटीनच्या पचनाची प्रक्रिया खूपच हळू असते. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला पोट भरलेलं असल्यासारखं वाटतं. जास्तकरून दह्यात ८० टक्के केसीन प्रोटीन असते. त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये दही खाल्ल्यास तुम्ही दिवसभरातील कॅलेरीजमध्ये घट करू शकता. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते. तर वेह आणि केसीन दोन्ही प्रोटीनमध्ये गरजेचे अमीनो अॅसिड्स असतात, ज्यामुळे ते सहज पचतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये घ्या हा नाश्ता  Description: Weight Loss Tips: एका उकडलेल्या अंड्यात ७८ कॅलेरीज आणि बऱ्याच प्रकारचे महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात. त्यासोबतच अंड्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन सुद्धा कमी करता येते. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola