Habits for flat stomach: ब्रेकफास्टमध्ये करा ‘हे’ पाच बदल, पोट होईल एकदम सपाट

सकाळी उठल्यानंतर आपण कधी नाश्ता करतो, त्यावर आपलं वजन आणि फिटनेस अवलंबून असतो. आपल्या नाश्ता कऱण्याच्या पद्धतीत काही बदल केले, तर कंबरेभोवतीची चरबी वेगाने कमी होऊ शकते.

Habits for flat stomach
पोट सपाट करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये ‘पाच’ बदल करा 
थोडं पण कामाचं
  • सकाळी उठल्यानंतर नाश्ता करणे आरोग्यासाठी फायदेशीर
  • उठल्यानंतर अर्ध्या तासात केलेला नाश्ता ठरतो फायद्याचा
  • सकाळी उठल्या उठल्या प्या एक ग्लास पाणी

‌‍‌Habits for flat stomach: सकाळचा नाश्ता (Morning breakfast) हे आरोग्यासाठी अनेक कारणांनी फायदेशीर मानला जातो. दिवसभराची ऊर्जा (Energy) देण्याचं काम हा नाश्ता करतोच, ‍‌‌‍त्याचप्रमाणे आपला मेंदू (Brain) आणि शरीराला (Body) एक प्रकारचं इंधन पुरवण्याचं काम करतो. सकाळच्या नाश्त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत (Immunity) सुधारणा होते. त्यामुळे कंबरेभोवती फॅट्स (Fats) जमा होण्याची प्रक्रिया थांबते आणि पोट सपाट व्हायला सुरुवात होते. आपण करत असलेल्या व्यायामाचाही त्यामुळे फायदा होतो आणि शरीरात साठलेल्या फॅट्स वेगाने कमी व्हायला सुरुवात होते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार सकाळच्या वेळी ब्रेकफास्ट करणाऱ्या व्यक्तींचं वजन हे इतरांच्या तुलनेत नियंत्रणात राहत असल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठी आपल्या ब्रेकफास्टमध्ये काही मूलभूत बदल करण्याची आवश्यकता असते. जाणून घेऊया, नेमके काय बदल करणं फायदेशीर ठरू शकतं, याविषयी. 

उठल्यानंतर 30 मिनिटांत करा नाश्ता

रात्री सहा ते आठ तासांची झोप काढल्यानंतर आपल्या शरीराला इंधनाची गरज असते. अनेक आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही नाश्ता केला नाही, तर तुमची पचनशक्ती कमालीची मंदावायला सुरुवात होते. त्यामुळे आपलं शरीर कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया बंद करतं. जाग आल्यानंतर बऱ्याच तासांनी खाल्लेलं अन्न पचवायला शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर अर्ध्या तासात नाश्ता करण्याचा सल्ला दिलाजातो. 

उठल्या उठल्या प्या पाणी

सकाळी जाग आल्यानंतर तुम्ही ताबडतोब 1 ग्लास पाणी पिणं हे आरोग्यासाठी उत्तम असतं. वास्तविक, जेवण्यापूर्वी किंवा कुठल्याही आहारापूर्वी जर तुम्ही एक किंवा दोन ग्लास पाणी पित असाल, तर साधारण 100 पाउंड वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. 

अधिक वाचा - Mouth Odor: तोंडाला दुर्गंधी येते? हे तीन अवयव असतात कारण, वाचा सविस्तर

गोडापासून राहा दूर

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, तर त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सकाळच्या नाश्त्यातून जर गोड पदार्थ तुम्ही वगळू शकलात, तर ती सर्वात योग्य बाब ठरेल. त्याऐवजी मुबलक प्रमाणात प्रोटिन असणारा आहार घेणं आवश्यक आहे. 

फायबरयुक्त आहार

फायबरयुक्त आहारामुळे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्याची भावना निर्माण होते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या नाश्त्यात जर फायबरयुक्त आहाराचा समावेश केला, तर बराच वेळ तुम्हाला पोट भरल्याची भावना टिकून राहिल आणि वारंवार भूक लागणार नाही. दिवसभर निर्माण होणाऱ्या अन्नाच्या क्रेव्हिंगपासूनही तुमची सुटका होऊ शकेल. 

अधिक वाचा - Mood swing remedies: वारंवार का होतात मूड स्विंग? करा हे सोपे उपाय

चहा आणि कॉफी 

सकाळी उठल्यानंतर पुढील अर्ध्या तासात जर तुम्ही चहा, कॉफी किंवा ग्रीन टी घेत असाल, तर त्यामुळे तुमची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरातील ऑक्सिडेशन रेट त्यामुळे वाढतो. केलेल्या व्यायामाचा त्यामुळे चांगला उपयोग होतो आणि कॅलरी जळण्याचा वेग वाढायला मदत होते. 

डिस्क्लेमर - वजन कमी करण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि निरीक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न अथवा शंका असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी