Tips For Belly Fat Loss : पुढे आलेले पोट कमी करण्यासाठी नका खाऊ हे पदार्थ

Breakfast Tips in marathi, To Reduce Visceral Fat Avoid These 5 Food If You Want To Lose Abdominal Obesity : सकाळी नाश्ता करायचा हे निश्चित असले तरी त्यावेळी काय खाता आणि काय खाणे टाळता हे महत्त्वाचे आहे. 

Breakfast Tips
पुढे आलेले पोट कमी करण्यासाठी नका खाऊ हे पदार्थ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • पुढे आलेले पोट कमी करण्यासाठी नका खाऊ हे पदार्थ
 • ब्रेकफास्टच्यावेळी हे खाणे टाळा
 • ब्रेकफास्टच्यावेळी हे खा

Breakfast Tips in marathi, To Reduce Visceral Fat Avoid These 5 Food If You Want To Lose Abdominal Obesity : दीर्घकाळ एका ठिकाणी बसून काम करणे, झोप आणि खाण्यापिण्याच्या वेळांमध्ये अनियमिततता असणे, जिभेचे चोचले पुरविणारे पण शरीरासाठी अपायकारक असलेले पदार्थ खाणे यामुळे वेगाने वजन वाढते. पोट सुटते. जर पोट कमी करायचे असेल तर हेल्दी लाइफस्टाईल अर्थात आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारणे आवश्यक आहे. रात्री किमान 6 ते 8 तास झोप आणि सकाळी 10 वाजेपर्यंत नाश्ता खाऊन घेणे आवश्यक आहे. तसे केले तर दिवसभर काम करण्यासाठी उत्साह राहील. सकाळी नाश्ता करायचा हे निश्चित असले तरी त्यावेळी काय खाता आणि काय खाणे टाळता हे महत्त्वाचे आहे. 

ब्रेकफास्टच्यावेळी हे खाणे टाळा

 1. चहा आणि कॉफी : अनेकांना सकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्यावर काम करण्यासाठी उत्साह येतो. पण चहा किंवा कॉफी ऐवजी ब्लॅक टी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. चहा अथवा कॉफी पिताना त्यात साखर (साखर अथवा शुगर क्युब्स अथवा स्वीटनर)  जेवढी कमी वापराल तेवढे आरोग्यासाठी चांगले आहे. साखर वजन वाढण्यासाठी तसेच मधुमेहासाठी कारणीभूत ठरते. यासाठी साखरेचा वापर कमी करा. साखर वापरणे टाळू शकलात तर आणखी उत्तम.
 2. ब्रेड : नाश्ता म्हणून अनेकजण ब्रेड खाणे पसंत करतात. पण ब्रेडचा अतिरेक धोकादायक आहे. व्हाईट ब्रेडऐवजी 1 वा 2 स्लाईस व्हीट ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड आरोग्यासाठी चांगला आहे. ब्रेडचा अतिरेक वजन वाढण्यासाठी तसेच मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकतो हे लक्षात ठेवून मर्यादीत प्रमाणात ब्रेड खा.
 3. ब्रेकफास्ट सीरिल : रेडीमेड ब्रेकफास्ट सीरिलमध्ये भरपूर साखर असते. यामुळे वजन वाढण्याचा तसेच मधुमेहाचा त्रास होण्याचा धोका असतो. यामुळे ​ब्रेकफास्ट सीरिल न खाणे हिताचे.
 4. फास्ट फूड, जंक फूड, फ्राय फूड, प्रोसेस्ड मीट : फास्ट फूड, जंक फूड, फ्राय फूड (तळलेले पदार्थ), प्रोसेस्ड मीट हे सर्व पदार्थ लठ्ठपणासाठी तसेच मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन फास्ट फूड, जंक फूड, फ्राय फूड, प्रोसेस्ड मीट न खाणे हिताचे.

पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे

Weight Loss: Kareena Kapoorसारखी झिरो फिगर मिळवायची असेल तर खा 'या' बिया; लोण्यासारखी वितळेल अतिरिक्त चरबी

ब्रेकफास्टच्यावेळी हे खा

 1. ताजी फळे : ताजी फळे खा. ताज्या फळांचे साखर न घातलेले ज्युस प्या. यामुळे दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते.
 2. दूध : नाश्ता करण्याच्यावेळी किमान एक कप किंवा एक ग्लास दूध पिणे हिताचे. यामुळे दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते.
 3. सुकामेवा : नाश्ता करण्याच्यावेळी मर्यादीत प्रमाणात सुकामेवा खाणे हिताचे. यामुळे दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते.
 4. पोहे, उपमा, दलिया : पोहे, उपमा, दलिया हे पदार्थ नाश्त्यात खाऊ शकता. यातून दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी