Healthy diet: आपल्या ब्रेकफास्टमध्ये करा 'या' हेल्दी गोष्टींचा समावेश

सकाळचा ब्रेकफास्ट आपल्या दिवसभराच्या कार्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट हा हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. जाणून घ्या सकाळी सकाळी काय हेल्दी खावं.

Healthy diet
Healthy diet: आपल्या ब्रेकफास्टमध्ये करा 'या' हेल्दी गोष्टींचा समावेश  |  फोटो सौजन्य: Instagram

प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे मजबूत इम्युन सिस्टम. यामुळेच तुम्ही आपण रोगांविरूद्ध लढण्यासाठी स्वत: ला तयार करू शकता. इम्युनिटी केवळ खाण्यात सुधारणा केल्यानेच आणता येऊ शकते. यासाठी तुम्हाला आपल्या ब्रेकफास्टमध्ये अशा काही गोष्टींचा समावेश करावा लागणार आहे.ज्यामुळे तु्म्ही प्रदूषणापासून बचाव करू शकता आणि त्यासोबतच इम्युनिटी सुद्धा वाढवाल. 

एक वाटी फळं

फळांमध्ये व्हिटामिन सी असतं. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. फळांमध्ये नैसर्गिक अशी साखर असते जी आपल्याला दिवसभर ऊर्जा देण्याचं कार्य करते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी सारख्या अनेक पोषक प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक ठरतात. संत्र, आवळा, कीवी, सफरचंद, डाळिंब आणि पपई दररोज जवळपास एक वाटी ब्रेकफास्टमध्ये खा. यामुळे तुमची इम्युनिटी वाढेल.

व्हिटामिन डीसाठी अंड खा

अंडयांमध्ये व्हिटॅमिन डी असते जे रोग प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. हिवाळ्यात, सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी असते, यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीचे संश्लेषण देखील कमी होते. अंड्यातलं योक व्हिटॅमिन डीसाठीचा एक चांगला स्त्रोत आणि न्याहारीचा एक चांगला पर्याय आहे. बर्‍याच रंगीबेरंगी भाज्यांसह बनविलेले आमलेट आरोग्यासाठी एक चांगला स्नॅक आहे आणि यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

सुका  मेवा

सुका मेव्यासोबत बऱ्याच प्रकारची बियाणं इम्युन वाढवतात आणि तुम्हाला अंतर्गत मजबूत आणि निरोगी बनवतात. ब्रेकफास्टमध्ये सुकामेवा खाणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रदूषणाचा धोका टाळता येईल. 

ग्रीन टी

चहामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे प्रदूषणाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. ग्रीन टी हा एक चांगला पेय पर्याय आहे.  तुळस, तमालपत्र, दालचिनी, आले आणि लिंबूपासून बनवलेली ग्रीन टी अँटिऑक्सिडेंटचे सामर्थ्य आहे आणि ती विषारी हवेपासून संरक्षण देते.

गुळ

गुळामुळे श्वसननलिका क्लिअर होते आणि एलर्जीची समस्या देखील दूर होते. गुळ आपण हे कधीही खाऊ शकता, परंतु ते खाल्ल्यानंतर फक्त आपले तोंड धुवा, पाणी पिऊ नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी