Breast Cancer: स्तनाचा कर्करोग झाल्यावर महिला किती दिवस जगतात? भारतीय महिलांबाबत धक्कादायक माहिती समोर

Breast Cancer survival: ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोग झाल्यास शेवटच्या स्टेजवर खूपच गंभीर होतो. यानंतर जगण्याची शक्यता खूपच कमी होते. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे काय आहेत? 
  • ब्रेस्ट कॅन्सर हा चौथ्या किंवा शेवटच्या स्टेजला पोहोचत तेव्हा तो जीवघेणा ठरतो

महिलांमध्ये Breast Cancer म्हणजेच स्तनाचा कॅन्सर हा महिलांमध्ये आता सामान्य कर्करोग झाला आहे. महिलांना सर्वाधिक स्किन कॅन्सर होतो. ब्रेस्ट कॅन्सर हा चौथ्या किंवा शेवटच्या स्टेजला पोहोचत तेव्हा तो जीवघेणा ठरतो. शेवटच्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाला मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात. जे महिला आणि पुरुषांना खूप कमी दिवस जगायला देतात.

मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर काय आहे? 

सीडीसीच्या मते, ब्रेस्ट कॅन्सर हा स्तनांच्या पेशींमध्ये होतो. जेव्हा या कर्करोगाच्या पेशी स्तनाच्या बाहेर येतात आणि फुफ्फुस, लिम्फ नोड्स सारख्या इतर अवयवांमध्ये पसरण्यास सुरुवात होते याला मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात. काखेत किंवा स्तनात गाठ येणे, ब्रेस्टला सूज येणे, निप्पल आतल्या बाजुला दाबले जाणे, ब्रेस्ट साईजमध्ये अचानक बदल होणे हे ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे मानली जातात.

हे पण वाचा : Kiss करण्याबाबत या 10 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का ?

लास्ट स्टेज 

ब्रेस्ट कॅन्सर चौथ्या स्टेजवर पोहोचल्यापूर्वी महिला जिवंत राहण्याची शक्यता खूप जास्त असते. Cancer.net च्या मते, जर कॅन्सर केवळ ब्रेस्टच्या पेशींपर्यंत मर्यादित असेल तर 90 टक्के लोक हे 5 वर्षांपर्यंत जिवंत राहतात आणि 10 वर्षांचा सर्वायवल रेट 84 टक्के आहे.

हे पण वाचा : शारीरिक संबंध ठेवताना महिला करतात या चुका आणि....

चौथी स्टेज घातक

जर ब्रेस्ट कॅन्सर शेवटच्या स्टेजपर्यंत पोहोचला तर खूपच घातक मानला जातो. Cancer.net च्या दुसऱ्या रिपोर्टनुसार, मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरची माहिती मिळताच केवळ 29 टक्के महिला 5 वर्षांपर्यंत जिवंत राहतात.

हे पण वाचा : शुक्रवारी रात्री कोणत्या राशीची व्यक्ती काय करते?

भारतात काय स्थिती?

NCBI च्या रिपोर्टनुसार, ब्रेस्ट कॅन्सरचा सर्वाइवल रेट हा भारतात खूपच वाईट आहे. कारण, खूप प्रकरणात ब्रेस्ट कॅन्सरची माहिती उशिरा मिळते. वर्ल्ड कॅन्सर रिपोर्ट 2020 नुसार, ब्रेस्ट कॅन्सर कंट्रोल करण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लवकर त्यावर उपाय करणे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी