वेळीच निदान ही आहे कर्करोगावर मात करण्याची गुरुकिल्ली

स्तनाचा कर्करोग जागरूकता महिना दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात जगभरात पाळला जातो. महिलांमध्ये या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर महिन्यात विविध उपक्रम राबविले जातात.

Breast Cancer awareness in marathi
वेळीच निदान ही आहे कर्करोगावर मात करण्याची गुरुकिल्ली 
थोडं पण कामाचं
  • वेळीच निदान ही आहे कर्करोगावर मात करण्याची गुरुकिल्ली
  • स्तनाचा कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर महिन्यात विविध उपक्रम राबविले जातात
  • कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यातून बरे होण्याची शक्यता वाढते

स्तनाचा कर्करोग जागरूकता महिना दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात जगभरात पाळला जातो. महिलांमध्ये या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर महिन्यात विविध उपक्रम राबविले जातात. स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये पहिल्या क्रमांकाचा कर्करोग आहे, भारतात २०१८ मध्ये दीड  लाखांहून अधिक नवीन स्तनाच्या कर्करोगाच्या रुगणांची प्रकरणे नोंदविली गेली आहेत. स्त्रियांमध्ये होणाऱ्या सर्व कर्करोगामध्ये हे प्रमाण चौदा टक्के इतके आहे. आज शहरी भारतातील २८ पैकी एक आणि ग्रामीण भारतातील ६० पैकी एक महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे.

स्त्री कर्करोग तज्ज्ञ डॉ तेजल गोरासिया सांगतात सर्व नवीन कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २७ टक्क्याहून कमी आहे तसेच सरासरी वयोगट हा ४० वर्षावरील आहे. भारतातील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण पाहता ८ पैकी १ महिला स्तनाच्या कर्करोगाने पीडित आहेत.  स्तनाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण भारतात जास्त आहे जेथे स्तनाच्या कर्करोगाच्या दोन पैकी एक रुग्ण पाच वर्षांत मरण पावतो. यामागचे कारण म्हणजे स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसंबंधी असलेल्या जागरूकतेचा अभाव. बहुतेक शहरी स्त्रियांना दुस-या टप्प्यातील  स्तनाचा कर्करोग आणि ग्रामीण महिलांना मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग आढळला आहे. स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त ४८ टक्के महिलांचे वय ५० वर्षापेक्षा कमी आहे.
 
स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीच्या घटकांमध्ये अनुवांशिकता, आसीन जीवनशैली, उशीराने होणारी गर्भधारणा, जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन, धूम्रपान, तरुणांमध्ये वाढलेला लठ्ठपणा, तणाव, कमी आहार घेणे ही प्रमुख कारणे आहेत. दुर्दैवाने, स्तनाच्या कर्करोगाचे सर्व जोखीम घटक पूर्णपणे काढून टाकण्याचे अद्याप कोणतेही मार्ग नाहीत.
 
अनुवांशिक जोखीम घटक जसे की काही विशिष्ट जनुकांमध्ये वारसाहक्काने झालेले बदल (BRCA1 आणि BRCA2 हे सर्वात सामान्य आहेत), कौटुंबिक इतिहास इत्यादी. जर तुमच्याकडे स्तनाचा कर्करोग किंवा ओव्हेरियन कर्करोगाने ग्रस्त (आई/बहीण/आई किंवा वडिलांची काकू) किंवा कुटुंबातील इतर कर्करोगाचा मजबूत इतिहास असेल तर तुमच्या  कर्करोगतज्ज्ञांच्या  मार्गदर्शनाप्रमाणे उत्परिवर्तनाची चाचणी घ्या. कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी किंवा शक्य तितक्या लवकर शोधून आपण प्रभाव कमी करू शकतो. वेळीच निदान होणे हे स्तनाच्या कर्करोगापासून सर्वोत्तम संरक्षण देते.

सर्व प्रभावित महिलांपैकी, अंदाजे दहा टक्के महिला आनुवंशिक कारणांमुळे कर्करोग पीडित आहेत. असा अंदाज आहे की बीआरसीए जनुक उत्परिवर्तन असलेल्या ६५ टक्के स्त्रियांना ७० वर्षांच्या आधी स्तनाचा कर्करोग होईल. असा सल्ला दिला जातो की ज्या स्त्रियांचा स्तन/अंडाशय/इतर कर्करोगाचा मजबूत कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी असामान्य जनुकाचा शोध घेण्यासाठी ऑन्कोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली अनुवांशिक चाचणी घ्यावी.
 
अनुवांशिक अभ्यासाची निवड कौटुंबिक इतिहासाच्या पद्धतीवर अवलंबून असते आणि संपूर्ण समुपदेशनासह ऑन्कोलॉजिस्टने मार्गदर्शन केले पाहिजे. साध्या रक्त चाचणीद्वारे अनुवांशिक चाचणी करणे सोपे आहे.
 
चाचणीच्या सकारात्मक परिणामाचा अर्थ असा नाही की आपल्याला स्तनाचा कर्करोग आहे. हे फक्त असे सूचित करते की आपल्याला कर्करोग होण्याचा आजीवन धोका वाढला आहे. यामुळे नियमित तपासणी करत राहणे आवश्यक आहे. रुग्ण आणि त्याच्याशी रक्ताचे नाते असलेल्या व्यक्ती यांनीही नियमित तपासणी करत राहणे आवश्यक आहे. परीक्षेच्या निकालांचे सर्व परिणाम समजून घेण्यासाठी समुपदेशन अत्यंत महत्वाचे आहे.

स्तनाची तपासणी १८ वर्षांच्या वयात सुरू झाली, २५ वर्षांच्या वयापासून प्रत्येक सहा महिन्यांनी क्लिनिकल स्तनाची तपासणी, स्क्रीनिंग उपाय म्हणून ३० वर्षांच्या वयापासून स्तन मेमोग्राम/एमआरआय करणे आवश्यक आहे. या सर्वांचा सारांश, प्रभावी स्क्रीनिंग प्रोटोकॉल आणि जागरूकतेद्वारे त्याविषयी ज्ञान वेळीच स्तनाचा कर्करोग शोधण्यात मदत करते आणि म्हणूनच तो पूर्णपणे बरा होतो.
 
कर्करोगाच्या कौटुंबिक इतिहासासह उच्च जोखमीच्या रूग्णांमध्ये अनुवांशिक चाचणी, लहान वयात निदान झाल्यास ऑन्कोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण समुपदेशनानंतर उपचार करणे फायदेशीर ठरते. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यातून बरे होण्याची शक्यता वाढते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी