स्तनपान करणाऱ्या महिलांनी खाऊ नये हे पदार्थ, बाळाला ठरू शकतात हानिकारक

तब्येत पाणी
Updated Jul 15, 2019 | 22:26 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जर तुम्ही स्तनपान करत आहात तर तुम्ही काही गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. उडदाची डाळ आणि उडदापासून बनवलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. कारण यामुळे पोटात गॅस निर्माण होऊ शकतो.

breastfeeding
स्तनपान करणाऱ्या महिला 

थोडं पण कामाचं

 • स्तनपान करणाऱ्या महिलांचे आरोग्य
 • उडदाचे पदार्थ स्तनपान करणाऱ्या महिलांनी खाऊ नये
 • बाळाच्या जन्मानंतर आईने पोषणतत्वे देणारे पदार्थ खावेत

मुंबई : बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरात पोषणतत्वाची कमतरता भासत असते. त्यामुळे या दरम्यान आईला चांगल्या शरीरासाठी  पौष्टिक आणि बॅलन्स डाएट घेण्याची गरज असते. यामुळे स्वत:सोबतच बाळाचे आरोग्यही चांगले राहते. कारण तुम्ही जे खात असता त्यातूनच तुमच्या बाळाला योग्य ते पोषक तत्व मिळत असते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केलेली छोटीशी चूकही तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यासाठी तुम्ही तर स्तनपान करत आहात तर तुम्ही काही पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे. खास करून जी सामान्य भारतीयांच्या खाण्यामध्ये असतात त्या गोष्टी. जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाऊ नयेत. 

स्तनपान करत असाल तर हे पदार्थ खाऊ नका

 1. उडदाची डाळ आणि उडदापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे पोटात गॅस बनू शकतो. तसेच बाळाच्या पोटदुखीसाठीही कारणीभूत ठरू शकते. 
 2. भरपूर तुपात किंवा तेलात तळलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे बाळाला अॅसिडिटी तसेच अपचन होऊ शकते. कारण बाळाचे लीव्हर तितके विकसित झालेले नसते. 
 3. साखर तसेच साखरेपासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा. कारण असे पदार्थ तुमच्या बाळासाठी हानिकार ठरू शकतात. आईचे जास्त गोड खाणे भविष्यात बाळाला डायबिटीजचे शिकार बनवू शकते. 
 4. जंक फूड, चिप्स, कोल्ड्रिंक आणि पिझ्झा बर्गर खात असाल तर मुलांमध्ये लठ्ठपणाची शक्यता वाढते. यासोबतच त्यांना हगवणीचाही त्रास होऊ शकतो. 
 5. स्मोकिंग, अल्कोहोल या सोबतच तुम्ही अधिक प्रिझर्व्हेटिव्ह असलेली ड्रिंक्स घेणे टाळा. कारण यामध्ये शुगर असते. तसेच नवजात बाळासाठी यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. 
 6. शिळे तसेच बराच काळ ठेवलेले पदार्थ खाऊ नका. यामुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासोबतच तुमच्या दुधातील पोषकतत्वेही कमी होतात. 
 7. खूप मसालेदार तसेच तिखट खाल्ल्याने तुमच्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे त्याच्या गळ्यात तुमच्या दुधाने जळजळही निर्माण होऊ शकते. तसेच अॅसिडिटीचाही धोका संभवतो. 
 8. कोबी, मटार तसेच कच्च्या भाज्या खाऊ नका. चांगल्या पद्धतीने शिजलेले तसेच उकळलेले पदार्थ खा. 
 9. कच्चे चणे, कच्चे सलाड जास्त प्रमाणात खाऊ नका. हे खाणे तुमच्या बाळाच्या पोटदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. 
 10. ज्या गोष्टी पचण्यास जड आहेत जसे नॉनव्हेज जास्त खाऊ नका. कमी प्रमाणात याचे सेवन करा. 


बाळाची प्रसूती झाल्यानंतर महिला जे अन्नपदार्थ खातात त्या अन्नाद्वारे नवजात बाळाला पोषणतत्वे मिळत असतात. त्यामुळे डिलीव्हरीनंतर आईचे खाणे-पिणे खूप महत्त्वाचे असते. बाळाच्या आरोग्यासाठी जे जे काही चांगले आहे त्याचा समावेश आईने आपल्या आहारात केला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
स्तनपान करणाऱ्या महिलांनी खाऊ नये हे पदार्थ, बाळाला ठरू शकतात हानिकारक Description: जर तुम्ही स्तनपान करत आहात तर तुम्ही काही गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. उडदाची डाळ आणि उडदापासून बनवलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. कारण यामुळे पोटात गॅस निर्माण होऊ शकतो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...