Weight Loss Tips : नाश्त्याची वेळ बदलून तुम्ही कमी करू शकता वजन आणि पोटाची चरबी, जाणून घ्या सर्वोत्तम वेळ

Weight reduction : अलीकडच्या काळात पोटाचा वाढलेला घेर, वाढलेले वजन ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. वाढते वजन (Over Weight) आणि पोटाची चरबी (Belly Fat)हे अनेक आजारांचे मूळ आहे. लठ्ठपणामुळे आत्मविश्वासही कमी होतो. प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते पण त्यासाठी प्रयत्न करणे प्रत्येकाला अवघड जाते. वजन घटवण्यासाठी डाएटिंगपासून ते वर्कआऊटपर्यंत कितीतरी प्रयत्न केले जातात. मात्र बहुसंख्य लोकांना हे कळत नाही की तुमच्या आहाराच्या वेळादेखील महत्त्वाच्या असतात.

Weight Loss & breakfast
न्याहारीची वेळ आणि वजन कमी करणे 
थोडं पण कामाचं
  • बदलत्या जीवनशैलीचा अनेकांना लठ्ठपणा किंवा वजनवाढीची मोठी समस्या
  • वाढते वजन आणि पोटाची चरबी हे अनेक आजारांचे मूळ
  • तुमची नाश्त्याची वेळ म्हणजेच सकाळचा नाश्ता तुमचे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते

Correct Breakfast Timing : नवी दिल्ली : अलीकडच्या काळात पोटाचा वाढलेला घेर, वाढलेले वजन ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. वाढते वजन (Over Weight) आणि पोटाची चरबी (Belly Fat) हे अनेक आजारांचे मूळ आहे. लठ्ठपणामुळे आत्मविश्वासही कमी होतो. प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते पण त्यासाठी प्रयत्न करणे प्रत्येकाला अवघड जाते. वजन घटवण्यासाठी डाएटिंगपासून ते वर्कआऊटपर्यंत कितीतरी प्रयत्न केले जातात. मात्र बहुसंख्य लोकांना हे कळत नाही की तुमच्या आहाराच्या वेळादेखील महत्त्वाच्या असतात.  तुमची नाश्त्याची (Breakfast) वेळ म्हणजेच सकाळचा नाश्ता तुमचे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. एका ब्रिटीश प्रोफेसरच्या मते, नाश्त्याची वेळ बदलून तुम्ही 2 ते 5 किलो वजन कमी करू शकता. तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या. (By changing timing of your breakfast you can loose the weight)

अधिक वाचा : Coconut water : नारळाचे पाणी हानिकारकदेखील ठरू शकते,जाणून घ्या किती आणि कोणत्या वेळी प्यावे

अनेकांना सकाळच्या नाश्त्याला उशीर होतो

प्राचीन काळी लोक सूर्यास्त होईपर्यंत अन्न खात असत. यानंतर ते सकाळीच काहीतरी खात असत. आहारात 14 ते 16 तासांचे अंतर हे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचे रहस्य आहे. लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही सकाळी 11 वाजता नाश्ता केला तर वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. आजकाल बरेच शास्त्रज्ञ जे अधूनमधून उपवास करण्याच्या फायद्यांबद्दल बोलत आहेत. नाश्ता वगळण्याचा किंवा त्याची वेळ वाढवण्याचा आग्रह धरत आहेत. किंग्स कॉलेज लंडनमधील जेनेटिक एपिडेमियोलॉजीचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर 11 वाजेपर्यंत नाश्ता करू नका.

अधिक वाचा : Long Hair Tips: लांब केसांची इच्छा होईल पूर्ण, फक्त या 3 गोष्टींची घ्या काळजी

14 तासांचे अंतर ठेवा

प्रोफेसरने यूकेमधील चेल्तेनहॅम सायन्स फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या संशोधनाचा निकाल सादर केला. रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या नाश्त्यापर्यत तुम्ही मोठा गॅप देऊन म्हणजे एवढी प्रतीक्षा करून तुम्ही 14 तास उपवास करू शकता. म्हणजेच, जर तुम्ही रात्रीचे जेवण 8 ते 9 वाजता केले असेल तर सकाळी 11 नंतर नाश्ता करून वजन कमी करू शकता. तुम्ही फक्त 11 वाजेपर्यंतच नाश्ता केला पाहिजे असे नाही. आपण रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्ता त्यापूर्वी देखील घेऊ शकता. एकंदरीत, जर तुम्ही उपवासाची वेळ म्हणजेच रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यातील अंतर हे 14 तासांचे राखले तर वजन राखण्यासोबतच तुमचे शरीरही डिटॉक्सिफिकेशन होते.

अधिक वाचा : Kidney Disease: चोर पावलाने येत आहेत किडनीच्या समस्या, वेळीच व्हा सावध आणि टाळा हे पदार्थ...

अर्थात वजन कमी करणे हे तसे सोपे नाही, त्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम तसेच योगा करण्याची गरज असते. वजन कमी करण्यासाठी आहार म्हणजेच योग्य डाएट असणे गरजेचे आहे. फळं खाल्यामुळेही वजन कमी होतं. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी