वजन कमी करायचं आहे, मग एक आठवडा फॉलो करा कोबीचा हा डाएट प्लान 

कोबी हा प्रकार डाएट प्लानमधली सर्वांत वेगवान पद्धत आहे. जो तुमचं शरीर केवळ सडपातळ नाही तर डिटॉक्स सुद्धा करतं. विशेष म्हणजे एक आठवडा तुम्ही कोबीचं डाएट प्लान फॉलो केलात तर तुमचं वजन वेगानं कमी होईल. 

Cabbage
वजन कमी करायचं आहे, फॉलो करा कोबीचा हा डाएट प्लान 

थोडं पण कामाचं

 • वजन कमी करण्यासाठी कोबी खूप फायदेशीर
 • कोबी खाल्ल्यानं वजन होतं कमी
 • एक आठवडाभर कोबीची डाएट प्लान फॉलो करा

मुंबईः  कधी कधी बराच व्यायाम करूनही वजन कमी करणं शक्य होतं नाही. त्यासाठी काही खास डाएट प्लानसोबत एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कोबीच्या डाएट प्लानच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करण्याचा गोल सहज मिळवू शकाल. कोबीचा डाएट प्लान मेटाबॉलिक रेट वर काम करतं. कोबी खाल्ल्यानं मेटाबॉलिक रेट वाढतं. यात फायबर देखील जास्त असतं. यामुळे वारंवार भूक पण लागत नाही आणि पोट भरलेलं वाटतं. कमी सोडिअम असलेलं डाएट प्लान कमी कॅलेरीज असतं. यात जी चरबी असते ते एनर्जीमध्ये स्थलांतरित होते आणि हेच वजन कमी करण्याची सोपी पद्धत आहे. 

कोबी डाएटचं खास वैशिष्ट्य हे आहे की, हे तुमच्यातील मेटाबॉलिक रेटला वेग आणतो. हा प्लान एक आठवड्यापर्यंत वाढवता येऊ शकतो. हा प्लान असा आहे की, तुम्हांला भुकलेले ठेवल्याविना तुमचं वजन कमी करण्यावर काम करतं. 

कोबीचा डाएट प्लान असा फॉलो करा. 

पहिल्या दिवसाची सुरूवात 

 • सकाळची सुरूवात लिंबू पाण्यानं करा. रिकाम्या पोटी हे पाणी तुमचं शरीर डिटॉक्स करेल. 
 • ब्रेकफास्ट- सकाळी ९ वाजण्याच्या आधी कोणतंही फळ खा. सफरचंद, संत्र पपई किंवा टरबूज इत्यादी. केवळ केळं खाऊ नये. कारण केळ्यात कार्ब असतात. 
 • लंच- दुपारी १ वाजेपर्यंत- कोबीच्या पानांचा रस काढा आणि तो प्या. 
 • संध्याकाळी- चार वाजता- सफरचंद किंवा पेरू सारख्या फळांचा रस घ्या.
 • डिनर सात वाजेपर्यंत- कोबीचा सूप बनवा. सुपामद्ये कोबी सुद्धा ठेवा ज्यामुळे त्यातून जास्तीत जास्त रस मिळेल. यात पनीरचे काही तुकडे सुद्धा टाकू शकता. 

दुसऱ्या दिवशी अशी करा सुरूवात 

 • ब्रेकफास्टच्या आधी- ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता. हवं असल्यास लिंबू पाणी ही घेऊ शकता. 
 • ब्रेकफास्ट सकाळी ९ वाजण्याआधी- कोबी आणि गाजरसोबत बीटाची स्मूदी बनवा. यात टोमॅटो टाकू शकता. 
 • लंच दुपारी एक वाजण्याआधी- सुक्या बीन्स किंवा कोबीचा सूप बनवा आणि यात स्वीट कॉर्न आणि पनीर घ्या. 
 • दुपारी चार वाजेपर्यंत- एक छोटी काकडी, गाजर आणि कॅबेजचा सलाड बनवा. 
 • डिनर रात्री ८ वाजण्याआधी- कोबीचं सूप बनवा आणि यात पनीर किंवा टोफू मिक्स करा. 

सहाव्या दिवशी काही असा ठेवा डाएट प्लान 

 • ब्रेकफास्टच्या आधी पहिले तुम्ही ग्रीन टी किंवा लिंबू पाण्यानं डिटॉक्स ड्रिंक तयार करा. 
 • ब्रेकफास्ट सकाळी ८ वाजेपर्यंत- केळ्याची स्मूदी आणि १ वाटी कोबी आणि अन्य भाज्यांसोबत ओट्स बनवा. 
 • लंच एक वाजेपर्यंत- कोबीचा सूप आणि चिकन ब्रेस्टसोबत मशरूम किंवा पनीर घ्या. 
 • चार वाजेपर्यंत- १ ग्लास कोणतंही साइट्रस ज्यूस 
 • ८ वाजेपर्यंत- कोबीचं सूप, पनीर किंवा चिकन ब्रेस्ट, मासे खाल्ल्यास उत्तम. 

सातव्या दिवशी असा असेल खास डाएट प्लान 

 • सकाळी ग्रीन टी किंवा दालचिनी चहा प्या. 
 • ब्रेकफास्ट- सफरचंद किंवा संत्राच्या रस किंवा कीवीची स्मूदी. 
 • लंच दुपारी एक वाजेपर्यंत - ब्राऊन राईससोबत गाजर किंवा पालक, किंवा कोबीसोबत डाळ. 
 • चार वाजेपर्यंत- केळं किंवा अन्य फळ.
 • डिनर रात्री आठवाजेपर्यंत- कोबी सूपासोबत चिकन किंवा पनीर, मशरूम. 

हा सात दिवसाचा डाएट प्लान तुम्ही पुढे सुरू ठेवू शकता. मात्र लक्षात ठेवा की जर अशक्तपणा किंवा चक्कर आल्यास हा डाएट प्लान करू नका. काही दिवसांच्या अंतरानं हा प्लान तुम्ही पुन्हा करू शकता. 

नोटः तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सुद्धा हाच डाएट प्लान फॉलो करा. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवसापासून तुम्ही ब्रेकफास्टमध्ये केळ्याची स्मूदी आणि दुपारी एक वाटी दही किंवा एक ग्लास मिल्क शेक सुद्धा घेऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी