नवी दिल्ली - कापूर (Camphor) हा दोन प्रकारचा (two types) असतो. एक जो पूजेसाठी (worship) वापरला जातो आणि दुसरा जो कपड्यांमध्ये (clothes) ठेवला जातो. पूजेसाठी वापरला जाणारा कापूर हा नैसर्गिक (natural) असतो ज्याला भीमसेनी कापूर (Bhimseni kapoor) म्हटले जाते. तर कपड्यांमध्ये ठेवण्याचा कापूर हा कृत्रिम (synthetic) असतो जो अनेक प्रकारच्या रसायनांनी (chemicals) तयार केला जातो. हा कापूर अनेकदा वापरला जातो पण याचे औषधी गुणही (medicinal qualities) भरपूर आहेत. हा एक ज्वलनशील (inflammatory) पदार्थ आहे आणि याचा गंधही तीव्र (strong smell) असतो.
अनेक औषधांच्या निर्मितीसाठी कापूर वापरला जातो. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या कापराच्या सुगंधामुळे मानसिक शांतता मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. इथे आम्ही आपल्याला सांगणार आहोत कापराचे असे काही फायदे जे आपल्या आयुष्यात मोठे बदल आणू शकतात. आपल्या शरीराच्या अनेक समस्या कापरामुळे दूर होऊ शकतात.
(डिस्क्लेमर- या लेखातले सर्व उपाय हे सामान्य माहितीसाठी दिलेले आहेत. त्यांना वैद्यकीय सल्ला मानू नये. कोणताही उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)