Corona Infection: एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा होऊ शकतो का कोरोनाचा संसर्ग?

तब्येत पाणी
Updated Jul 29, 2020 | 22:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोरोना बरा झाल्यानंतर काही आठवड्यांनी चाचणीचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह येत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अशा बातम्यांनी अनेक तज्ञांना हैराण केले आहे आणि ते याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.  

Representative image
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाही
  • चाचणीचे अहवाल चुकीचे असण्याची शक्यता
  • पुन्हा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमुळे इतरांना लागण झाल्याचा पुरावा नाही

वॉशिंग्टन: एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग (corona infection) होऊ शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचे शंभर टक्के योग्य उत्तर अजूनही वैज्ञानिकांनाही (Scientists) ठाऊक नाही. पण असे होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. आरोग्य तज्ञांच्या मते कोव्हिड-19चा संसर्ग (COVID-19 infection) झालेल्या व्यक्तींच्या शरीरात काही कारणाने रोगप्रतिकारकशक्ती (antibodies) विकसित होते, पण या शक्तीचा स्तर काय असेल आणि ती किती काळ टिकेल याची माहिती त्यांना नाही.

यामुळे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का या प्रश्नाने अनेक तज्ञांना विचार करायला भाग पाडले आहे. अनेक तज्ञांच्या मते लोकांना तोच आजार होत आहे किंवा चाचणीच्या अहवालात आधीच्याच संसर्गाचे शिल्लक राहिलेले अवशेष आढळून येत आहेत. चाचणीचा अहवाल चुकीचा येत असण्याची आणि यामुळे दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे बोलले जात असल्याची शक्यता आहे.

वैज्ञानिकांच्या मते रुग्ण एकदा बरा झाल्यानंतर चाचणीच्या अहवालात पुन्हा संसर्ग झाल्याचे दिसून आल्यानंतर इतरांना लागण झाल्याचा काहीही पुरावा नाही. इतर विषाणूंबद्दल झालेल्या अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की पहिल्या संसर्गानंतर तीन महिने ते एक वर्षाच्या काळात पुन्हा याची लागण होऊ शकते.

पण कोरोना विषाणूच्या बाबतीत असे होऊ शकते का याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. बोस्टन कॉलेजच्या वैश्विक जनआरोग्य कार्यक्रमाचे निर्देशक डॉ. फिलिप लँड्रिगन यांनी सांगितले की हे नवे आणि उदयोन्मुख शास्त्र आहे.

भारतातील कोरोनाची स्थिती

देशभरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५,०९,४४७ इतकी आहे. यापैकी ९,८८,०२९ कोरोनामुक्त झाले आहेत. ३४,१९३ जणांचा मृत्यू झाला आहे तर सध्याच्या स्थितीत ५,०९,४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी