कोरोनापासून वाचण्यासाठी कोणतं आहे 'सुरक्षा कवच'; मास्कविषयी नवं संशोधन

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज हजारो नागरीक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत.

can masks prevent spred of coronavirus know what new research
मास्कविषयी नवं संशोधन  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अतिसूक्ष्ण कण अनेक दिवसांपर्यंत हवेत राहू शकतात
  • हवेतून प्रसार होणाऱ्या आजारासाठी सोशल डिस्टन्सिंग नाकामी
  • कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क प्रभावी

नवी दिल्‍ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज हजारो नागरीक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. दरम्यान कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचा असेल तर मास्क हाच आपला सुरक्षा कवच असल्याचं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या महामारीच्या काळात मास्कने लाखो लोकांचा जीव वाचवला आहे. हा मास्क जो घालतो त्याचं रक्षण करतेच शिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही संसर्ग होण्यापासून वाचवत असतो. 

दरम्यान अमेरिकेच्या जॉर्जिया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने याविषयी एक संशोधन केले आहे. यात म्हटलं आहे की अनेक स्थर असलेला मास्क हा संसर्ग होण्यापासून ९६ टक्के वाचवू शकतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने अनेक स्थर आणि चांगल्या पद्धतीने बनवलेला मास्क घालणाऱ्या व्यक्तीपासून निघणारे ८४ टक्के कणांना रोखण्यास यशस्वी होतो.
व्हायरसच्या प्रसाराला रोखण्यास प्रभावी आहे मास्क

तज्ज्ञांच्या मते, जर दोन जणांनी या प्रकारचा मास्क घातला तर ते संक्रमणाला ९६ टक्के रोखू शकतात. एयरोसोल साइंस एंड टेक्नोलॉजी मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार,मास्क किती चांगला आहे, हे मास्क बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरण्यात आले आहे, यावर अवलंबून असतं. मास्कचा घट्टपणा जर सर्व गुणवत्तेत योग्य उतरला तर व्हायरसचा प्रसार कमी करू शकतो. या अभ्यासामध्ये, विविध प्रकारच्या पदार्थांपासून अगदी लहान कणांच्या प्रकाशाचा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एका संशोधकाच्या मते, अतिसूक्ष्ण कण अनेक तास आणि खूप दिवसांपर्यंत हवेत राहू शकतो.

हे हवेच्या प्रवाहावरही अवलंबून असते. अशात जर कोणत्या घराच्या खोलीत हवा खेळती राहत नसेल तर त्या खोलीत सूक्ष्मकण जास्त काळ राहू शकतात. इतर संशोधन हे सांगण्यात आले आहे की, कोविड-१९ चा प्रसार रोखण्यास सोशल डिस्टन्सिंगपेक्षा मास्क अधिक प्रभावी आहे. फिजिक्स ऑफ फ्लुइड्स मासिकाच्या अभ्यासानुसार, हवेतून होणाऱ्या प्रसाराला रोखण्यासाठी ६ फुटाचे अंतर काही कामी येत नाही.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी