डायबिटीजच्या रुग्णांनी अंडी खाल्ली पाहिजे का? जाणून घ्या या जरूरी गोष्टी

तब्येत पाणी
Updated Jul 02, 2018 | 17:01 IST | IANS

मधुमेह असलेल्या रुग्णांना अनेक गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यांनी अंडी खाणे टाळले पाहिजे का. जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खावी का नाही...

eggs benifits
अंड्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: Thinkstock

सिडनी :  मधुमेहाच्या रुग्णांनी आता रोज कोणतीही शंका मनात न आणता अंडी खाल्ली पाहिजे, त्यामुळे त्यांना कोणतेही नुकसान होणार नाही. नव्या संशोधनात समोर आले आहे की, आठवड्यातून १२ अंडी खाल्याने मधुमेहाची प्रथम स्टेज असणाऱ्या किंवा टाइप टू असणाऱ्यांना हृदय रोगाचा धोका नाही. अंड्यांमध्ये कोलेस्ट्रोलचा स्तर अधिक असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अंडी न खाण्याचा सल्ला दिला जातो.


अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशनमध्ये प्रकाशित एका संशोधनाचा हवाला देत सांगितले आहे की अंड्यांमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या स्तरावर कोणताही परिणाम होत नाही. या शोधाचे सह लेखक आणि सिडनी विद्यापीठाचे निकोलस फुलर यांनी सांगितले की, मधुमेहाची पहिली स्टेज किंवा टाइप २ च्या रुग्णांना अंडी खाण्याच्या सुरक्षित स्तराबाबत मतभेद आहेत. पण संशोधनात असे स्पष्ट करण्यात आले की, अंडी खाणे तुमच्या खानपानाच्या शैलीचा हिस्सा असेल तर  अंडी खाणे थांबविले नाही पाहिजे.

त्यांनी सांगितले की,  लोण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल खाण्याचा सल्ला संशोधनात देण्यात आला आहे. अंडी हे प्रोटीन आणि सुक्ष्म पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. अंडी खाल्याने फायदा होतो. ते डोळे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. तसेच रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यात अंडी मदत करते.

गरोदरपणात अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
डायबिटीजच्या रुग्णांनी अंडी खाल्ली पाहिजे का? जाणून घ्या या जरूरी गोष्टी Description: मधुमेह असलेल्या रुग्णांना अनेक गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यांनी अंडी खाणे टाळले पाहिजे का. जाणून घ्या मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खावी का नाही...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...