तुम्हांला शुगर आहे ?  मग  हे जरुर खा

तब्येत पाणी
Updated Jul 02, 2018 | 23:25 IST | पूजा विचारे

मधुमेहाच्या रुग्ण आता रोज न घाबरता अंड खाऊ शकतात. एका नव्या शोधातून ही माहिती समोर आली आहे.

प्रोटीन युक्त अंड
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: IANS

सिडनी : मधुमेहाच्या रुग्ण आता रोज न घाबरता अंड खाऊ शकतात. एका नव्या शोधातून ही माहिती समोर आलीय.. एका आठवड्यात १२ अंडी खाल्ल्यास कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. हे स्पष्ट झालंय.. अंड्यांमध्ये कोलेस्टेरोलचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे डॉक्टर अंडी खाण्यास नकार देतात. 

अमेरिकेच्या डॉक्टरांचा सल्ला
अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आलीय..  अंड्यांमध्ये  असलेल्या जीवनसत्त्वाचा कोलेस्टेरोलच्या स्थरावर काही परिणाम उद्धभवत नाही. या शोधाचे सहलेखक आणि सिडनी विश्वविद्यालयचे निकोलस फुलर यांनी म्हटलंय की,  मधुमेहाच्या रुग्णांनी अंड खाऊ नये किंवा खावं. यावर खूप वाद झाले.. त्यानंतरचं आम्ही हे संशोधन केलं.. त्यानंतर आम्ही केलेल्या संशोधन असे संकेत देतात की, जर का मधुमेहाच्या रुग्णांना अंड खायची सवय असल्यास त्यांनी न घाबरता ते खावं... अंड खाण्यावर काही मर्यादा नसल्याचं संशोधकांनी म्हटलंय.

मधुमेहाच्या रुग्नांनी हे नक्कीच खावं
 मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्याच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी. तेलाचे पदार्थ टाळावे. ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा.  अंड हे प्रोटीन आणि सुक्ष्म पोषक मिळण्यासाठी चांगलं साधन असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच अंड खाण्याचे अनेक फायदे आहेत.अंड खाल्यानं डोळे आणि हृद्यविकारचा आजार होते नाहीत.. रक्तवाहिनीसाठी अंड फायदेशीर ठरतं. गरोदर महिलांना अंड खाण्याचा सल्ला दिला जातो...
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी