फक्त सहा महिन्यांत औषधामुळे १८ जण झाले कॅन्सरमुक्त

Cancer Was Completely Cured In Drug Trial In Just Six Months For The First Time In History Shocked Medical World : फक्त एक औषध घेऊन १८ रुग्ण सहा महिन्यांत कॅन्सरमुक्त झाले. हा दावा अमेरिकेतील क्लिनिकने केला आहे. या संदर्भातले वृत्त 'न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केले आहे. 

Cancer Was Completely Cured In Drug Trial In Just Six Months For The First Time In History Shocked Medical World
फक्त सहा महिन्यांत औषधामुळे १८ जण झाले कॅन्सरमुक्त  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • फक्त सहा महिन्यांत औषधामुळे १८ जण झाले कॅन्सरमुक्त
  • 'न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केले वृत्त
  • रेक्टल कॅन्सर अर्थात गुदाशयाचा कर्करोग झालेले १८ जण औषधामुळे सहा महिन्यांत कॅन्सरमुक्त

Cancer Was Completely Cured In Drug Trial In Just Six Months For The First Time In History Shocked Medical World : वॉशिंग्टन : कॅन्सर झालेल्या रुग्णांना केमो थेरपी अर्थात किरणोत्साराद्वारे उपचार घ्यावे लागतात. या उपचारांमुळे शरीरात उष्णता निर्माण होणे, तोंडाची चव जाणे, केस गळणे, अशक्तपणा येणे, सतत घाम येणे आणि उकडणे असे वेगवेगळे त्रास होतात. पण हे त्रास टाळून फक्त एक औषध घेऊन १८ रुग्ण सहा महिन्यांत कॅन्सरमुक्त झाले. हा दावा अमेरिकेतील क्लिनिकने केला आहे. या संदर्भातले वृत्त 'न्यूयॉर्क टाइम्स'ने प्रसिद्ध केले आहे. 

अमेरिकेतील क्लिनिकने रेक्टल कॅन्सर अर्थात गुदाशयाचा कर्करोग झालेल्या १८ रुग्णांना डोस्टरलिमॅब (Dostarlimab) नावाचे औषध दिले. सलग सहा महिने फक्त डोस्टरलिमॅब (Dostarlimab) हे एकच औषध घेणारे १८ रुग्ण आता कॅन्सरमुक्त झाले असल्याचे क्लिनिकने जाहीर केले. 

क्लिनिकने रुग्णांना दिलेले डोस्टरलिमॅब (Dostarlimab) हे औषध प्रयोगशाळेत तयार करण्यात आले आहे. हे औषध कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी शरीरात मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविके अर्थात अँटीबॉडी निर्माण करते. 

प्रयोग सुरू करण्याआधी प्रयोगात सहभागी झालेल्या १८ रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या होत्या. सहा महिन्यांनंतर जेव्हा पुन्हा चाचण्या घेण्यात आल्या त्यावेळी एकाही रुग्णाच्या शरीरात कॅन्सरच्या पेश आढळल्या नाही. एकदम १८ जणांच्या बाबतीत अशी घटना घडल्यामुळे प्रयोग करणाऱ्या क्लिनिकमधील टीमचा उत्साह वाढला आहे. 

इतिहासात पहिल्यांदाच औषधाची सहा महिने क्लिनिकल ट्रायल केल्यावर कॅन्सर झालेले १८ रुग्ण बरे झाले. ही एक ऐतिहासिक घटना आहे, कॅन्सरच्या रुग्णांसाठी पहिली मोठी आनंदाची बातमी आहे, असे न्ययॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या डॉ लुइस ए डियाज जे यांनी सांगितले. 

रेक्टल कॅन्सर अर्थात गुदाशयाचा कर्करोग झालेल्या १८ रुग्णांनी सलग सहा महिने फक्त डोस्टरलिमॅब (Dostarlimab) हे एकच औषध घेतले. या औषधामुळे कॅन्सरमुक्त झालेल्यांपैकी कोणालाही साईडइफेक्ट झालेले नाही. यामुळे पहिल्या १८ जणांच्या क्लिनिकल ट्रायलला अभूतपूर्व यश मिळाल्याचे चित्र आहे. 

पहिली क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यामुळे डोस्टरलिमॅब (Dostarlimab) औषधाचा मोठ्या प्रमाणावर प्रयोग करण्याची तयारी सुरू झाली आहे. अद्याप डोस्टरलिमॅब (Dostarlimab) हे औषध प्रयोगाच्या पातळीवर आहे. यामुळे डोस्टरलिमॅब (Dostarlimab) हे औषध सध्या खुल्या विक्रीसाठी उपलब्ध नाही. नियंत्रित पद्धतीने अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीत रेक्टल कॅन्सर अर्थात गुदाशयाचा कर्करोग झालेल्या रुग्णांना डोस्टरलिमॅब (Dostarlimab) औषध दिले जाईल. जर प्रयोगाला अपेक्षित यश मिळाले तर रेक्टल कॅन्सरवर उपचार करण्यासाठी एक प्रभावी औषध उपलब्ध होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी